Home शहरं मुंबई Sushant Singh Rajput: sushant singh rajput: सुशांतच्या आत्महत्येचा धक्का; आठवड्याभरात चौघांनी मृत्यूला...

Sushant Singh Rajput: sushant singh rajput: सुशांतच्या आत्महत्येचा धक्का; आठवड्याभरात चौघांनी मृत्यूला कवटाळले – another sushant singh rajput fan committed suicide


मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याने बॉलिवूडसह त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हा धक्का सहन न झाल्याने अंदमान येथील त्याच्या एका चाहतीने आत्महत्या केली असून सुशांतसिंहसाठी जीवन संपविण्याची आठवडाभरातील ही चौथी घटना आहे.

सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर बॉलिवूडसह त्याच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्याने अंदमान-निकोबारच्या पोर्ट ब्लेअरमध्ये राहणाऱ्या एका १५ वर्षाच्या मुलीने घरात गळफास लावून आत्महत्या केली. १७ जून रोजी ही घटना घडली. आत्महत्येपूर्वी या मुलीने कोणतीही सुसाईड नोट ठेवलेली नव्हती. मात्र, पोलिसांनी तिच्या घरातून जप्त केलेल्या तिच्या डायरी जप्त केली आहे. त्यात तिने सुशांतसिंह राजपूत विषयी बरंच लिखाण केलेलं आहे. त्यामुळे सुशांतसिंहच्या आत्महत्येचा धक्का सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली असावी असा कयास वर्तवला जात आहे. गेल्या काही दिवसापासून ही मुलगी डिप्रेशनमध्ये होती, असं तिच्या कुटुंबीयांनी पोलीस चौकशीत सांगितलं. त्यामुळे पोलीस आता या आत्महत्येचं कनेक्शन सुशांतसिंहच्या आत्महत्येशी जोडत आहेत. त्या आधी उत्तर प्रदेशातली बरेली येथील एका शाळकरी विद्यार्थ्यानेही आत्महत्या केली होती.

सुशांतसिंह जर आत्महत्या करू शकतो, तर मीही तसंच करू शकतो, असं त्यानं मृत्यूपूर्वी त्याच्या भावाला सांगितलं होतं, असं त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. तर बिहारच्या नालंदामधील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येची बातमी ऐकल्यानंतर मुलगा खूप दुःखी होता. मात्र, तो हे टोकाचे पाऊल उचलेल याची पुसटशी कल्पनादेखील नव्हती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

सुशांतच्या चाहत्यांकडून सलमानच्या बिईंग ह्युमन स्टोअरची तोडफोड

बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील मलडिहा येथे राहणारी सुशांतसिंहची चुलत वहिनी सुधा देवीनेही सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकून अन्नपाणी सोडलं होतं. त्यानंतर सुशांतच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार सुरू असतानाच तिकडे बिहारमध्ये सुधा देवीनेही प्राण सोडले होते. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे फॅन्सही जीवन संपवत असल्याने खळबळ उडाली आहे.

पुन्हा भेटू तेव्हा सांगेन…सुशांतसाठी महेश शेट्टीची भावुक पोस्ट

दरम्यान, करोनामुळे सुशांतसिंहच्या अंत्यसंस्कारावेळी बॉलिवूडमधील मोजकेच कलाकार उपस्थित होते. यावेळी श्रद्धा कपूर, अरुण शौरी आणि विवेक ओबेरॉयसह काही बडे कलाकार उपस्थित होते. विलेपार्लेतील पवनहंस स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशांतच्या अंत्यसंस्कारांवेळी जोरदार पाऊसही सुरू झाला होता. पावसामुळे स्मशानभूमीच्या बाहेर वाहतूक कोंडी झाली होती. सुशांतच्या आत्महत्येमागचं गुढ उकलण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून त्याच्या बहिणीसह अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच सुशांतचे फोन रेकॉर्ड्सही तपासले जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आता आरोप करून साध्य काय होणार- सोनाली कुलकर्णीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad News : ‘स्मार्ट सिटी’साठी आणखी दीडशे कोटी – rs 150 crore more for ‘smart city’

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसाठी केंद्र आणि राज्य शासनाने मिळून आणखीन १५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. शासनाने दिलेल्या निधीच्या...

Pimpri Chinchwad: Pimpri chinchwad: बहिणीने प्रेमविवाह केला; चिडलेल्या भावानं तलवारी नाचवल्या, वाहनांची तोडफोड – pimpri chinchwad man vandalised vehicles after his sister love marriage

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून अल्पवयीन भावाने १२ वाहनांची तोडफोड केली. तसेच हातात कोयता घेऊन परिसरात साथीदारांच्या मदतीने दहशत निर्माण...

Recent Comments