Home मनोरंजन Sushant Singh Rajput: sushant singh rajput : सुशांतसिंह राजपूतचं स्मारक होणार; कुटुंबीयांनी...

Sushant Singh Rajput: sushant singh rajput : सुशांतसिंह राजपूतचं स्मारक होणार; कुटुंबीयांनी केली मोठी घोषणा – sushant singh rajput’s family to turn his patna residence into a memorial


मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला. सुशांतच्या जाण्याने त्याच्या कुटुंबीयावरही दु:खाचा डोंगर कोसळला. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी बिहार येथील पाटणामधील त्याच्या घराचं स्मारकात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या कुटुंबीयांनी एक पोस्ट शेअर करत हा निर्णय जाहीर केला आहे.

सुशांतच्या कुटुंबीयांनी सुशांतसिंह राजपूत फाऊंडेशनची स्थापना केली आहे. त्यांतर्गत त्याचं पाटण्यातील राजीव नगरमधील घराचं स्मारकात रुपांतर करण्यात येणार आहे. या स्मारकात आम्ही सुशांतच्या संग्रहातील वस्तू ठेवू. त्याची पुस्तकं, टेलिस्कोप आणि फ्लाईट सिम्युलेटर्स सह अनेक गोष्टी त्यात ठेवण्यात येईल. त्याच्या चाहत्यांसाठी या वस्तू पाहण्याकरिता खुल्या असतील, असंही त्यांनी म्हटलंय. तसेच, सुशांतच्या नावाने काढलेल्या या संस्थेद्वारे क्रीडा, सिनेमा आणि विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना पाठबळ देण्यात येणार असल्याचंही त्याच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

सुशांत जगासाठी सुशांतसिंह राजपूत होता. पण आमच्यासाठी तो फक्त गुलशन होता. तो खूप बोलका, मनमोकळा आणि स्वतंत्र विचारसरणीचा होता. काही तरी करून दाखवण्याची त्याच्यात ऊर्मी होती. त्यानं जे स्वप्न पाहिलं, त्याच स्वप्नांचा त्याने मनापासून पाठपुरावा केला, असं त्याच्या कुटुंबीयांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा खुलासा!

सिनेसंगीत क्षेत्रातही घराणेशाहीचा ‘राग’

सुशांतसिंहने १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. बराचवेळ दरवाजा वाजवूनही त्याने दरवाजा न उघडल्याने त्याच्या नोकराने घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळला. सुशांत हा गेल्या काही दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होता, त्याच्यावर मनोविकार तज्ज्ञाकडून उपचारही सुरू होते, असं सूत्रांनी सांगितलं. टीव्ही अभिनेता म्हणून करियरची सुरुवात करणाऱ्या सुशांतने मोठ्या संघर्षानंतर बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. सुशांतने ‘किस देश में है मेरा दिल’ मालिकेत पहिल्यांदा काम केलं. मात्र त्याला खरी ओळख एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून मिळाली. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘काय पो छे’ हा सुशांतचा पहिला सिनेमा होता. पहिल्याच सिनेमातील अभिनयाबद्दल त्याचं कौतुकही झालं होतं. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नव्हतं. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवरील बायोपिकने त्याचे बॉलिवूडमधील स्थान अधिक पक्कं केलं होतं.


सुशांत स्वखर्चातून विद्यार्थ्यांना नासाच्या वर्कशॉपसाठी पाठवायचा!

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

vaccine production site: Coronavaccine: …तोपर्यंत लसीविषयीचे दावे विश्वासार्ह मानता येणार नाहीत! – now essential to maintain cold chain from the vaccine production site to...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनास प्रतिबंध करणाऱ्या लसीच्या उपयुक्तता आणि क्षमतेविषयी सातत्याने दावे केले जात आहेत. मात्र तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या यशस्वी झाल्याखेरीज...

Recent Comments