Home शहरं जळगाव SUSHANT SINGH RAJPUT'S: सुशांत सिंहच्या चित्रपटातील गाणं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या...

SUSHANT SINGH RAJPUT’S: सुशांत सिंहच्या चित्रपटातील गाणं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या – sushant singh rajput’s 21-year-old fan commits suicide


जळगाव: व्हॉट्सअॅपवर दिवंगत अभिनेता सुशांत सिंहचे गाणे स्टेट्स ठेवत जळगाव तालुक्यातील शिरसोली येथिल २१ वर्षीय तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी दुपारी साडेतीन वाजता उघडकीस आली. तुषार ज्ञानेश्वर बारी (वय २१,) असे मृत तरुणाचे नाव आहे.

शिरसोली येथे राहणारा तुषार याचे शिक्षण पू्र्ण झाले आहे. त्यानतंर तो आपल्या आई वडीलांना शेतीकामात मदत करत होता. आज रविवारी दुपारी त्याचे आई-वडील शेतात कामाला गेले होते. आजी व लहान बहिण घरी असताना तुषार याने मागच्या खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आजीच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानतंर परिसरातील नागरिकांनी ओढणी कापुन तुषारला खाली उतरवले. यांनतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृतदेह आणला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन तुषारला मृत घोषित केले.

वाचाः पडळकरांची झोप उडेल अशा शिव्या देऊ; हसन मुश्रीफ संतापले

गळफास घेण्यापूर्वी तुषार यांच्या व्हॉट्सअॅपवर अभिनेता सुशांत सिंहच्या चित्रपटातील गाणे त्याने अपलोड केले होते. त्यासोबतच ‘आय हेट लाईफ’ अशा मेसेजही होता.

दरम्यान तुषार हा नैराश्यात होता का? त्याने कशामुळे आत्महत्या का केली ? याबाबत स्पष्ट माहिती अद्याप मिळू शकली नाही. तुषारच्या मृत्यूमुळे कुटुंबिय, नातेवाईकांना प्रचंड धक्का बसला आहे. कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला. तुषार याच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ, लहान बहिण व आजी असा परिवार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus vaccine news: Coronavirus Vaccine करोना: ऑक्सफर्ड लस चाचणीत एक चूक ठरली वरदान; अनेक शंका उपस्थित – coronavirus vaccine updates oxford vaccine trial mistakes...

लंडन: सगळ्यात स्वस्त आणि प्रभावी ठरू शकणारी लस ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाने विकसित केली आहे. तिसऱ्या टप्प्यातील लस चाचणीत एक छोटीशी चूक वरदान ठरली असली तरी...

Maharashtra minister: धान खरेदी केंद्र वाढवा – maharashtra minister chhagan bhujbal has directed increase number of grain shopping centre to administration

म. टा. प्रतिनिधी, मुंबई विदर्भात गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील धान खरेदीबाबत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली....

PMJJY available in Postal Payment bank: PMJJY जीवन ज्योती योजना; पोस्ट पेमेंट बँकेतही मिळणार जीवन ज्योती विमा – jeevan jyoti yojana now available in...

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमध्येही (आयपीपीबी) आता पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आयपीपीबीने पीएनबी मेटलाइफ...

Recent Comments