Home शहरं कोल्हापूर swabhimani shetkari sanghatana: संघटनेत आता कोणतेही मतभेद नाहीत; राजू शेट्टी यांचं स्पष्टीकरण...

swabhimani shetkari sanghatana: संघटनेत आता कोणतेही मतभेद नाहीत; राजू शेट्टी यांचं स्पष्टीकरण – raju shetty name fixed legislative council seat


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: संघटनेच्या सर्वच सदस्यांनी माझ्या नावाला संमती दिल्याने राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यत्वासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आपलेच नाव सूचविण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी पक्षाच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यत्वासाठी शेट्टी यांचे नाव निश्चित झाल्यानंतर संघटनेतून त्याला जोरदार विरोध झाला होता. या विरोधाने घायाळ झाल्यानंतर ‘ही आमदारकीची ब्यादच नको’ म्हणत उमेदवारी नाकारली होती. पण नंतर पक्षाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील व अनिल मादनाईक यांनी विरोध मागे घेत पाठिंबा दिला. यामुळे शेट्टी यांच्या विधान परिषदेचा मार्ग मोकळा झाला. शुक्रवारी रात्री संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये शेट्टी यांच्या नावावर एकमत झाले.

वाचाः महापालिकेच्या सभेत आयुक्त मुंढे यांच्यावर आरोपांच्या फैरी, आयुक्त सभा सोडून निघाले

या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विधान परिषद सदस्यत्व स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे स्पष्ट केले. संघटनेत आता कोणतेही मतभेद राहिले नाहीत, आम्ही सर्व चळवळीत एकदिलाने यापुढे काम करू अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

वाचाः ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्तीचं राजू शेट्टी यांना रक्तानं पत्र

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी यांचे नाव विधान परिषदेसाठी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील व खजिनदार अनिल मादनाईक यांनी विरोध केला होता. या दोघांसह संघटनेच्या प्रमुख नेत्यांची जयसिंगपूर येथे बैठक झाली. या बैठकीत घरातील भांडण घरातच मिटविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांचेच नाव विधान परिषदेसाठी सुचविण्याचे ठरले. यामुळे गेले दोन दिवस संघटनेत सुरू असलेले वादळ शमले आहे.

वाचाः केंद्रीय पथक जळगावात; करोनासंबंधी दिले ‘हे’ निर्देशSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

बुद्धिवान कलांवत :श्रीकांत मोघे

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या अल्याड-पल्याड ज्या कलावंतांनी सांस्कृतिक महाराष्ट्र घडवला, मध्यमवर्गीयांच्या अभिरुचीला आकार दिला, त्या लेखक-दिग्दर्शक-कलावंतांच्या मांदियाळीतील एक अस्सल मोहरा म्हणजे . शहरी-ग्रामीण दोन्ही...

maharashtra budget 2021: राज्यासमोर आर्थिक संकट; ठाकरे सरकारपुढे आव्हान – maharashtra budget session 2021 : ajit pawar will submits the budget in the assembly

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोना संसर्गाची धास्ती आणि टाळेबंदीमुळे गेले वर्षभर सामान्यांची घडी विस्कटली असून त्याचा परिणाम म्हणून राज्याचा महसूल घटला आहे....

Recent Comments