Home मनोरंजन swapnil joshi on world social media day: सोशल मीडिया दिन: स्वप्निल जोशी...

swapnil joshi on world social media day: सोशल मीडिया दिन: स्वप्निल जोशी तुम्हाला देणार बर्थडेच्या शुभेच्छा…पण ‘या’ अटीवर – world social media day actor swapnil joshi ask fans to help ngo for social cause


कल्पेशराज कुबल

‘गेली अनेक वर्षं तुम्हा चाहत्या मंडळींचे मेसेज, मागण्या माझ्यापर्यंत येत आहेत. बऱ्याचदा तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छांचे व्हिडीओ हवे असतात. तुमचा किंवा तुमच्या प्रियजनांचा वाढदिवस असतो किंवा आणखी काही निमित्त असतं. त्यासाठी माझ्या शुभेच्छा तुम्हाला हव्या असतात. हे तुमचं माझ्यावरील प्रेम आहे; असं मी समजतो. यापूर्वी मी काही माझ्या चाहत्यांना शुभेच्छांचे व्हिडीओ पाठवले आहे. पण, सर्वांनाच तसं पाठवणं शक्य होत नाही. पण, आता मात्र तुम्हा सर्वांना मी माझ्याकडून शुभेच्छांचे व्हिडीओ पाठवणार आहे. फक्त त्यासाठी एक अट आहे’…हे म्हणणं आहे अभिनेता स्वप्निल जोशी याचं. मंगळवारी असणाऱ्या ‘वर्ल्ड सोशल मीडिया डे’निमित्त स्वप्निलनं आपल्या चाहत्यांच्या सहकार्यानं एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. ज्या उपक्रमाच्या निमित्तानं, ज्यांना मदतीची गरज आहे अशा अनेक चेहऱ्यांवर हसू फुलेल.

या उपक्रमाअंतर्गत स्वप्निलचे चाहते त्याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट जोडले जाऊ शकतात. या निमित्तानंच ते चाहते एखाद्या सेवाभावी संस्थेला मदत करु शकतील. याविषयी अधिक माहिती देताना स्वप्निल सांगतो की, ‘माझ्या अनेक चाहत्यांना माझ्या व्हिडीओ प्रतिक्रिया हव्या असतात. मी देखील त्या करून देण्यासाठी तयार आहे. पण, या व्हिडीओचं थोडं थोडकं हा होईना मूल्य असणं आवश्यक आहे; हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे मी एक असा उपक्रम हाती घेतलाय की, जर कुणाला माझी व्हिडीओ प्रतिक्रिया हवी असेल तर त्या व्यक्तीला मी व्हिडीओ नक्कीच पाठवेन. पण, त्या व्यक्तीनं अगोदर गरजू मंडळींना मदत करायला हवी. या उपक्रमातून मला स्वतःला कोणत्याही प्रकारे अर्थार्जन करायचं नाही. मला फक्त ‘मदत’ करण्याची सवय समोरच्यांना लावायची आहे. त्यामुळे मी सांगतोय की, माझ्याकडे मदत न पाठवता तुम्ही स्वतःच त्या संबंधित सेवाभावी संस्थेला मदत करा.

सुशांतचा सर्वात जवळचा मित्र संदीप सिंहवर संशय; केले जातायत अनेक आरोप
ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत अशा कुटुंबातील तरुणानं उभारलेल्या एका संस्थेची निवड या उपक्रमासाठी सध्या केली आहे. ‘प्रार्थना बालग्राम’ असं या निवासी प्रकल्पाचं नाव आहे. याची संपूर्ण माहिती मी माझ्या swwapniljoshi.com या वेबसाइटवर दिली आहे. हळूहळू एक-एक सेवाभावी संस्थांची निवड मी या उपक्रमासाठी करणार आहे.’ या उपक्रमात सहभागी होऊन जे चाहते मदतीचा हात पुढे करतील, त्या सर्वांना स्वप्नील त्यांना हव्या त्या प्रतिक्रियेचा शुभेच्छा व्हिडीओ पाठवणार आहे.

१७ वर्षांचा संसार; अमृता सुभाषच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?
माझ्या चाहत्यांकडून मला खूप प्रेम मिळतं. ते यापुढेही असंच मिळत राहावं. पण, माझ्या लोकप्रियतेचा फायदा जर कोणत्याही गरजू व्यक्तीसाठी, सेवाभावी संस्थेसाठी होणार असेल, त्यांना त्यानिमित्तानं आर्थिक सहाय्य मिळणार असेल; तर त्याचा मला अधिक आनंद होईल. म्हणूनच मी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यानिमित्तानं माझ्या चाहत्यांही माझा असलेला कनेक्ट अधिक घट्ट होईल आणि दुसरीकडे मदतीची एक साखळीदेखील तयार होईल, जी गरजूंना आधार देणारी असेल.

– स्वप्नील जोशी, अभिनेता

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

bike taxi service in mumbai: बाइक टॅक्सी सुरू – rapido company has decided to start bike taxi service in mumbai

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबईच्या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी मुंबईकरांना नवीन प्रवासी वाहतूक सेवेचा पर्याय शुक्रवारपासून खुला झाला आहे. मुंबईत बाइक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय...

Recent Comments