“ग्राहकांना ऑर्डर्सच्या संदर्भात चांगला अनुभव देणे आणि वारंवार ऑर्डर नोंदवण्याचे प्रमाण सर्वाधिक राखणे यासाठी पेमेंट आणि रिफंडच्या संदर्भात सर्वोत्तम अनुभव ग्राहकाला मिळवून देणे अत्यंत महत्त्वाचे असून आमच्या व्यासपीठावर आता अतिसूक्ष्म पातळीवरील वितरण सेवा पुरवणारे बहुसंख्य पर्याय उपलब्ध आहेत, असे स्विगीचे प्रॉडक्ट्स विभागाचे उपाध्यक्ष आनंद अगरवाल यांनी सांगितले. ते म्हणाले, ग्राहकांना सध्या पैसे अदा करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांसह स्विगी मनीमुळे त्यांना ऑर्डरची नोंदणी करताना विनाअडथळा आणि सुलभ व्यवहार करता येतील. बराच वेळ चालणारी पेमेंट प्रक्रिया किंवा ऐन मोक्याच्या क्षणी रक्कम अदा करणे फेटाळले गेल्यामुळे होणारा त्रास वाचून ग्राहकांच्या अनुभवात अधिक सुधारणा होईल.”
या भागिदारीबाबत आयसीआयसीआय बँकेच्या डिजिटल चॅनल्स आणि पार्टनरशिप विभागाचे प्रमुख बिजिथ भास्कर म्हणाले, स्विगीसोबत ग्राहकांना देऊ केलेली आमची ही तिसरी सेवा आहे. वर्षभरापूर्वी आम्ही स्विगीच्या वितरण भागिदारांसाठी पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी या उद्योगातील पहिलेच असे यूपीआय आधारित पेमेंट सोल्यूशन आणले होते. त्यानंतर स्विगीच्या लाखो ग्राहकांसाठी यूपीआय आधारित तात्काळ वन-क्लिक पेमेंट पर्यायही आम्ही उपलब्ध करून दिला होता.” भारतात अन्नपदार्थ वितरण क्षेत्राचा पाया रचणारी कंपनी म्हणून प्रख्यात असलेली स्विगी ५०० हून अधिक शहरांमध्ये सेवा देत असून ‘स्विगी ग्रोसरी’ आणि ‘स्विगी जिनी’ या नव्यानेच सुरू केलेल्या सेवांच्या माध्यमातून विस्तारत आहे.