Home क्रीडा T-20 World Cup: ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी ही आहे मोठी समस्या... - big problem...

T-20 World Cup: ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी ही आहे मोठी समस्या… – big problem on organizing t-20 world cup in australia


करोना व्हायरसमुळे ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार की नाही, याबाबत मोठा संभ्रम आहे. या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आता एक मोठी पुढे आल्याचे कळत आहे. कारण ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा मंत्रालयाने ही समस्या व्यक्त केली आहे.

करोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलिया सर्व विमान सेवा रद्द केली आहे. त्यामुळे या विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियामध्ये संघ नेमके कसे पोहोचणार, ही एक समस्या आहे. पण ही समस्या सोडवली जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण यापेक्षाही एक मोठी समस्या असल्याचे म्हटले जात आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषक जर होऊ शकला नाही तर ऑस्ट्रेलियाला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, असे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जर विश्वचषक झाला नाही तर भारताचा दौराही होऊ शकत नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ३० करोड डॉरलचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ही स्पर्धा काहीही करून भरवावी लागणार आहे. पण ऑस्ट्रेलियापुढे विश्वचषक भरवण्यात कोणती मोठी समस्या आहे….

विश्वचषकासाठी ही आहे मोठी समस्या…
या विश्वचषकात आठ देशांचे संघ कसे, येणार ही मोठी समस्या नाही. तर या विश्वचषकासाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांना कसे आणायचे, ही मोठी समस्या आहे. कारण एवढी मोठी स्पर्धा जर प्रेक्षकांविना खेळवली गेली नाही तर ते चांगले दिसणार नाही, असे ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. कारण जर प्रेक्षक स्टेडियममध्ये नसतील तर खेळाडूंनाही खेळताना मजा येणार नाही. त्याचबरोबर स्टेडियममध्ये वातावरण निर्मिती होणार नाही.

याबाबत ऑस्ट्रेलियाचे क्रीडा मंत्री रीचर्ड कोलबेक यांनी सांगितले की, ” भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका चांगलीच रोचक होईल आणि ही मालिका कशी रंगते ते मला पाहायचे आहे. त्याचबरोबर ट्वेन्टी-२० विश्वचषक नियोजित वेळेमध्ये कसा खेळवला जातो, हेदेखील आमच्यासाठी फार महत्वाचे आहे. विश्वचषकासाठी संग कसे येतील, हा मुद्दा महत्वाचा नाही. त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्टेडियममध्ये चाहते कसे येतील. माझ्यामते या विषयावर गंभीरपणे विचार करायला हवा.”Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nanded govt officers horse latest news: ‘या’ अधिकाऱ्याला घोड्यावरून ऑफिसला यायचंय!; विनंती पत्र झालं व्हायरल – official seeks nod to tie horse on campus...

हायलाइट्स:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याचं पत्र चर्चेत.कार्यालयाच्या आवारात घोडा बांधण्यासाठी मागितली परवानगी.अजब पत्राने जिल्हाधिकारी विपिन इटनकर पडले बुचकळ्यातनांदेड:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागात...

Recent Comments