मानधनात कपात करण्याच्या मुद्द्यावर बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नू हिनं मत व्यक्त केलंय. लॉकडाउनमुळं शुटिंग बंद आहेत त्यामुळं पगारसुद्धा मिळत नाहीये आणि यापुढंही मानधनात कपात होईल, येणाऱ्या परिस्थितीसाठी मी तयार आहे. असं तापसी पन्नूनं म्हटलं आहे. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत तापसी म्हणाली आहे.
वाचाः ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानावर चित्रपट येणार
लॉकडाउनमध्ये अनेक निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर थिएटर मालकांनी असंतोष व्यक्त केलायं. यावरही तापसी बोलली आहे, ते नाराज आहेत हे ऐकून मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही, त्याचा राग अगदीच योग्य आहे. मात्र, आपल्याला आता वाट पाहावी लागणार आहे पुढं काय घडणार याची. भारतात थिएटर व्यवसाय कधीच बंद होणार नाही, असंही ती म्हणाली आहे.
वाचाः सलमान खान फिल्म्स विरोधात तक्रार दाखल, अभिनेत्याने केले गंभीर आरोप
डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतात हे सिनेमे
अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बम’, अभिषेक बच्चन आणि राजकुमार रावचा ‘लुडो’, जान्हवी कपूरचा ‘गुंजन सक्सेनः द कारगिल गर्ल’ आणि अमिताभ बच्चन यांचा ‘गुलाबो सिताबो’ व ‘झुंड’ हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.