वाचा- पालघरमधल्या घटनेची लाज वाटते, गंभीरची टीका
जगभरत क्रीडा स्पर्धा बंद असताना तैवानने मात्र बेसबॉल स्पर्धेचे आयोजन केले. सर्व जगासमोर एक आदर्श निर्माण करणाऱ्या तैवानमधील एका बेसबॉल सामन्यात दोन संघांमधील खेळाडूंमध्ये राडा झाला. चीनच्या अगदी जवळ असलेल्या तैवानमध्ये करोनाचे ४२२ रुग्ण आढळले आहेत तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तैवान आणि चीनचे आर्थिक संबंध असताना देखील त्यांनी करोना व्हायरसला नियंत्रणात ठेवले आहे. यामुळेच तैवानचे जगभरात कौतुक होत आहे.
वाचा- त्या लोकांना करोना रुग्णांच्या सेवेसाठी पाठवा!
करोना नियंत्रणात असल्यामुळे तैवानने देशातील बेसबॉल स्पर्धा रद्द न करण्याचा निर्णय घेतला. जगातील काही मोजक्या लीग स्पर्धेत याचा समावेश होतो. करोनामुळे अन्य स्पर्धा रद्द झाल्या असताना ही लीग स्पर्धा मात्र सुरू होती.
वाचा- ऑस्ट्रेलियाची बॉर्डर सील; काय होणार टी-२० वर्ल्ड कपचे?
We have our first bench-clearing incident in the 2020 #CPBL season. https://t.co/Jwwo0oxMIi
— CPBL STATS (@GOCPBL) 1587303484000
वाचा- ठाकरे सरकार झोपा काढतंय का? बबीताची टीका
पण रविवारी स्पर्धेतील राकुटेन मोंकीज आणि फुबोन गार्डियन्स या दोन संघात सुरू असलेल्या सामन्यात खेळाडूंमध्ये राडा झाला. फुबोनचा पिचर हेनरी सोना याने राकनेट च्या कुओ येन वेनला चेंडू मारला आणि दोन संघांच्या खेळाडूंमध्ये राडा सुरू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वाचा-
ओव्हरमध्ये ६ सिक्स मारल्यानंतर बॅट चेक केली होती- युवराज