Home देश Tamil Nadu Boiler Explosion: चेन्नई: नेवेली लिग्नाइटमध्ये भीषण स्फोट; ६ ठार, १६...

Tamil Nadu Boiler Explosion: चेन्नई: नेवेली लिग्नाइटमध्ये भीषण स्फोट; ६ ठार, १६ जखमी – Tamil Nadu Boiler Blast At Nlc Thermal Power Station In Cuddalore 6 Dead And 16 Injured In An Incident


चेन्नई: तामिळनाडूतील नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशनमध्ये (एनएलसी) बॉयलरमध्ये झालेल्या भीषण स्फोटात एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर या दुर्घटनेत १६ लोक जखमी झाले आहेत. कंपनीच्या बॉयलरमध्ये झालेल्या या स्फोटानंतर एनएलसीच्या अग्निशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवले. या स्फोटानंतर कुड्डालोर जिल्हा प्रशासनाचे एक पथक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी तातडीने रवाना झाले.

हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण समजू शकलेले नाही. तथापि, या स्फोटामागील कारणांचा तपासादरम्यान शोध घेतला जाणार आहे. असे असले तरी, प्राथमिक अहवालानुसार, बॉयलरच्या या स्फोटामुळे एकूण ६ लोकांचा जीव गेला असून यात १६ लोक जखमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. अशाच प्रकारचा आणखी एक स्फोट ७ मे या दिवशी नवेली पॉवर प्लांटमध्ये झाला होता. मे महिन्यात झालेल्या या स्फोटात देखील कंपनीतील ५ लोकांनी आपला जीव गमावला होता.

७ मे या दिवशी झालेला हा स्फोट कंपनीच्या ८४ मीटर उंची असलेल्या बॉयलरमध्ये झाला होता. त्यावेळी कर्मचारी आणि तंत्रज्ञ ३२ मीटरच्या अंतरावर उपस्थित होते. या स्फोटानंतर सीआयएफएसच्या अग्निशमन दलानेच या आगीवर नियंत्रण मिळवले होते. या स्फोटामुळेही अनेक लोक जखमी झाले होते. तर या दुर्घटनेतही ५ जणांचा बळी गेला होता.

७ मे या दिवशी कंपनीत झालेल्या स्फोटाची चौकशी करण्यासाठी ६ सदस्यीय समितिचे गठन केले जाईल असे या दुर्घटनेनंतर कंपनीने म्हटले होते. या समितीचे प्रमुख कंपनीचे जनरल मॅनेजर असतील आणि त्यांच्या नेतृत्वात या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जाईल, असे कंपनीने म्हटले होते. या दुर्घटेचा तपास करण्याबरोबरच अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा कंपनीत होऊ नये यासाठी ही समिती योग्य ती पावले उचलेल असेही कंपनीने जाहीर केले होते. मात्र, मे महिन्यात झालेल्या स्फोटानंतर आता पुन्हा बॉयलरमध्ये स्फोट झाला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

farmers protest: tractor rally : दिल्लीत हिंसक आंदोलन; केंद्राकडून गंभीर दखल, सिंघू सीमेवरून शेतकरी नेते ‘गायब’ – tractor rally violence in farmers protest signs...

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात ( farmers protest ) शेतकरी ट्रॅक्टर परेडमध्ये ( tractor rally ) मंगळवारी हिंसाचार झाला. शेतकरी आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड...

R. Ashwin: टीम इंडियामध्ये लागलं मोठं चॅलेंज, पुजाराने ‘ही’ गोष्ट केल्यावर अश्विन अर्धी मिशी ठेवणार – ind vs eng : indian cricketer r. ashwin...

नवी दिल्ली, IND vs ENG : भारतीय संघामध्ये सध्याच्या घडीला एक मोठं चॅलेंज लागलेलं आहे. हे चॅलेंज भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भरवश्याचा फलंदाज...

Recent Comments