Home मनोरंजन television news News : लॉकडाउनंतर प्रेक्षकांच्या आवडत्या 'या' मालिका होणार बंद -...

television news News : लॉकडाउनंतर प्रेक्षकांच्या आवडत्या ‘या’ मालिका होणार बंद – favorite hindi tv shows might be go off air after lockdown


उपमा सिंह
करोनाच्या संकटामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून चित्रीकरण बंद होतं. आता नव्यानं चित्रीकरण सुरू होणार असलं, तरी काही हिंदी मालिकांना गाशा गुंडाळावा लागणार आहे. त्यामुळे हिंदी टीव्हीविश्वात चिंतेचं वातावरण आहे. आधीच लॉकडाउनच्या संकटामुळे बंद झालेलं चित्रीकरण आणि आता तर थेट मालिकाही बंद होणार असल्यानं अनेक कलाकार-तंत्रज्ञांना घरी बसायची वेळ येणार आहे. हातातल्या मालिका अशा बंद पडल्यामुळे नवीन कामासाठी त्यांना बराच काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं चित्र दिसतंय.

‘ये ऊन दिनों की बात हैं’ या मालिकेतली अभिनेत्री आशी सिंघ हिच्या एका नव्या मालिकेचं चित्रीकरण लवकरच सुरू होणार होतं. ‘दिल जैसे धडके धडकने दो’ असं त्या मालिकेचं नाव. लॉकडाउनमुळे त्याचं चित्रीकरण लांबलं. आता तर मालिकाच सुरू होणार नसल्याचं तिला कळलं. त्यामुळे तिला नव्या मालिकेत काम मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहेच. त्यातच लॉकडाउनमुळे बिघडलेलं वातावरण सामान्य होण्याची चिन्हं अद्याप दिसत नसल्यानं आशी सिंघ चिंतेत आहे. ‘कार्तिक पौर्णिमा’ ही मालिका सुरू झाली आणि दोन महिन्यांतच लॉकडाउन आलं. आता ही मालिकासुद्धा बंद होणार आहे. त्यामुळे या मालिकेतील कलाकार आणि कर्मचारी-तंत्रज्ञांच्या चमूला दुसरं काम शोधावं लागणार आहे.

आधीच लॉकडाउनचे तीन महिने कलाकार, इतर कर्मचारी-तंत्रज्ञ घरातच होते. त्यात आता मालिका बंद होणार असल्यानं त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलं आहे. लॉकडाउनमध्ये बंद होणाऱ्या मालिकांमध्ये ‘नागीण चार’ ही प्रसिद्ध मालिकादेखील आहे. त्यातला नायक विजयेंद्र कुमेरिया म्हणाला, की ‘अशा प्रकारे अचानक मालिका बंद झाल्यामुळे कलाकार, लाइटबॉय, स्पॉटबॉय या सगळ्यांच्याच रोजगारावर गदा येते. खरं तर मालिका अचानक बंद होणं नवीन नाही. या आधीही पंधरा दिवस आधी नोटीस देऊन मालिका बंद होत होत्या. त्यामुळे आम्ही मालिका कधीही बंद होऊ शकेल या तयारीत असतो. पण, आता अनेक मालिका एकत्रपणे बंद झाल्या आहेत. त्यामुळे अचानक अनेक जण बेरोजगार झाले आहेत. जेव्हा सर्व सुरू होईल तेव्हा सर्वांना काम मिळावं अशी आशा करतो. निर्माते या सर्वांचा विचार करतील अशी अपेक्षा आहे.’

हिंदी मालिका

चार महिने मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं. रोज सेटवर येण्यासाठी जुहू ते मालाड प्रवास करणं कठीण असल्यानं मी सेटजवळच शिफ्ट होणार होतो. मालिकेत मुख्य भूमिका असल्यामुळे मी कोणताही चित्रपट किंवा दुसरी मालिका घेतली नव्हती. कारण वेळ देता आला नसता. आता अर्ध्यातच मालिका बंद झाल्यामुळे हातात दुसरं काहीही नाहीय. संपूर्ण मालिकेच्या टीमला धक्का बसला आहे. त्यात आता ऑडिशनदेखील देऊ शकत नसल्यानं चिंता वाढली आहे.
हर्ष नागर, अभिनेता

मनोरंजन क्षेत्रात अनिश्चितता असते. मोठ्या मुश्किलीनं मिळालेलं काम अशाप्रकारे बंद झालं तर खूप वाईट वाटतं. माझी आधीची मालिका संपल्यावर मला तब्बल सात महिन्यांनंतर ‘दिल जैसे धडके..’ ही मालिका मिळाली होती. लॉकडाउनमुळे शूटिंग झालं नाही आणि मालिका बंद झाली. आता दुसरी मालिका कधी मिळेल माहीत नाही. कामासाठी आणखीन प्रतीक्षा करावी लागेल. पुढचे दिवस कठीण जातील. कारण तीस टक्के लोकच शूटिंगसाठी येऊ शकणार आहेत. ही परिस्थिती खडतर आहे.
आशी सिंघ, अभिनेत्री

संकलन – रिद्धी बांदिवडेकरSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Samsung smartphones: सॅमसंगचे हे प्रोडक्ट्स सर्वात स्वस्त खरेदीची संधी, सेलमध्ये या ऑफर्स – samsung smartphones, galaxy watch and tablets on discounted price on amazon...

नवी दिल्लीः सॅमसंगचे नवीन स्मार्टफो खरेदी करायचा असेल किंवा नवीन व्हियरेबल, सर्वात स्वस्त खरेदीच करण्याची संधी आहे. ई-कॉमर्स अॅमेझॉनवर सुरू असलेल्या कंपनीच्या फ्लॅगशीप,...

Aurangabad Municipal Corporation: शहरासाठी आठवड्यातून दोन चांगल्या गोष्टी करा! – Aurangabad municipal corporation will has started love Aurangabad campaign under Aurangabad smart city devlopment...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादऔरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून महापालिका शहरात 'लव्ह औरंगाबाद' अभियान सुरू करणार आहे. या अभियानात सहभागी होताना प्रत्येक नागरिकाने...

Recent Comments