Home देश terrorist attack on crpf party: काश्मीर: सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला; १ जवान...

terrorist attack on crpf party: काश्मीर: सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला; १ जवान शहीद, ३ जखमी – terrorist attack on a party of crpf in bijbehara of anantnag in jammu and kashmir three crpf jawans injured and a youth dead in attack


श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) तुकडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला असून तीन जवान जखमी झाले आहेत. तर या हल्ल्यात एका स्थानिक मुलाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ही माहिती सीआरपीएफने दिली आहे.

दक्षिण काश्मीच्या बिजबेहरा भागात आज शुक्रवारी दहशतवाद्यांनी सुरक्षादलांना आपले लक्ष्य करत हल्ला केला. सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये बिजबेहरा येथे चकमक सुरू झाली आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सील केला आहे. या भागात लपलेल्या सर्व दहशतवाद्यांना हुडकून काढण्याचे काम सुरक्षादलांनी हाती घेतले आहे. सध्या बिजबेहरा येथे चकमक सुरू असून सुरक्षा दलाचे जवान देखील दहशतवाद्यांना लक्ष्य करत आहेत.

त्रालमध्ये ३ दहशतवादी ठार

हा दहशतवादी हल्ला होण्यापूर्वी त्रालमध्ये झालेल्या सुरक्षादले आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत ३ दहशतवादी ठार झाले आहेत. ही चकमक गुरुवारी रात्रीपासून सुरू झाली होती. या चकमकीनंतर २ दहशतवाद्यांचे शव सुरक्षादलांनी ताब्यात घेतली आहे. तर तिसऱ्या दहशतवाद्याच्या मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे.

जून महिन्यात दक्षिण काश्मीरमध्ये मारले गेले ३३ दहशतवादी

जम्मू आणि काश्मीर राज्यात दहशतवाद्यांविरोधातील सुरक्षा दलांचे अभियान तीव्र गतीने सुरू आहे. या कारवाईबाबत मिळालेल्या माहितीनुसार फक्त दक्षिण काश्मीर भागात जून महिन्यात आतापर्यंत एकूण १२ चकमकी झाल्या आहेत. या चकमकींमध्ये आतापर्यंत एकूण ३३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

वाचा: काश्मीर: सोपोरमध्ये चकमक, २ दहशतवादी ठार; इंटरनेट सेवा बंद

आतापर्यंत १०३ दहशतवादी ठार

जम्मू आणि काश्मीरच्या सोपोर भागात सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीदरम्यान गुरुवारी २ दहशतवादी ठार झाले. तसेच, दक्षिण काश्मीरमध्ये रविवारी सुरक्षा दलाने वेगवेगळ्या चकमकींमध्ये ४ दहशतवाद्यांना ठार केले होते. सर्वप्रथम सुरक्षा दलाने शोपियान जिल्ह्यात एक दहशतवादी ठार झाला. त्यानंतर श्रीनगरच्या जादिबलमध्ये शोध मोहीम सुरू असताना झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने ठार केले.

वाचा: पुलवाम्यात २ दहशतवादी ठार; एक जवान शहीद, ४ महिन्यात १०० दहशतवाद्यांना कंठस्नान

गेल्या ४ महिन्यांमध्ये दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिज्बुल मुजाहिद्दीन आणि अंसार गजवात-उल-हिंदचे अनेक कमांडर ठार झाले आहेत. सुरक्षादल सतत काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांना कंठस्नान घालत आहेत. या वर्षात आतापर्यंत १०३ दहशतवादी ठार झाले आहेत.

वाचा: काश्मिरात दहशतवाद्यांवर ‘डबल अटॅक’; ४ दहशतवादी ठारSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bharat Arun: चौथी कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघाने घेतली होती मोठी रिस्क – aus vs ind indian cricket team bowling coach bharat arun reaction on...

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाने घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे विजय मिळाल्याचे संघाचे गोलंदाजीचे कोच भरत अरुण ( bharat arun) यांनी सांगितले....

Anna Hazare: अण्णा हजारेंच्या आंदोलनाचे काय होणार? संभ्रम वाढला – no team this time, anna hazare will alone go on fast over farmers issue

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनासाठी यावेळी ‘टीम अण्णा’ तयार करण्यात आलेली नाही. वेळ पडलीच तर हजारे एकटेच उपोषण सुरू करणार, हे...

Gwalior: पत्नी ७ महिन्यांची गर्भवती होती, पती दारूच्या नशेत घरी आला अन्… – gwalior drunk husband beats to death his pregnant wife in madhya...

ग्वाल्हेर: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोहना पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्यामपूर गावात मद्यधुंद पतीने केलेल्या बेदम मारहाणीत सात महिन्यांची...

Recent Comments