Home महाराष्ट्र Thane Crime: खळबळजनक! तरुणाला नग्न करून बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल - thane...

Thane Crime: खळबळजनक! तरुणाला नग्न करून बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल – thane crime youth beaten and being naked by goons


ठाणे: गुंडांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे चित्र ठाण्यातील एका खळबळजनक घटनेने दिसून येते. आपली दहशत परिसरात कायम राहावी म्हणून काही गुंडांनी एका तरुणाला नग्न करून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. इतकेच नाही तर, तरुणाला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही केला.

ठाण्यात ही घटना घडली आहे. १२ जून रोजी घडलेल्या या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ तीन-चार दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पीडित तरुणाने गुंडांच्या भीतीने पोलीस ठाण्यात तक्रार केली नाही. हा तरुण तब्बल आठ दिवस घरातून बाहेरही पडला नाही. विविध पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद असलेला विकी भोसलेची दहशत कायम राहावी म्हणून तरुणाला मारहाण केल्याचे बोलले जात आहे.

गुन्हेगार आणि गुंडांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाकच राहिला नाही, असे परिसरात बोलले जात आहे. परिसरात आपली दहशत कायम राहावी म्हणून विक्की भोसले आणि त्याच्या साथीदारांनी या तरुणाला मारहाण केली. मारहाण करणाऱ्या सहापैकी दोन जण हे अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आणि पीडित तरुणाचा शोध घेण्यात आला. ठाणे शहरातील श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या तरुणाचा शोध घेतला. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने घडलेली घटना पोलिसांना सांगितली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

धक्कादायक! ऑनलाइन क्लासला कंटाळून ८वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

लॉकडाउनचा बळी, आर्थिक चणचणीतून सलून चालकाची आत्महत्या

विक्की भोसले आणि त्याच्या साथीदारांनी तरुणाला विवस्त्र केले आणि बेदम मारहाण केली. तसेच ‘विक्की भोसले बॉस आहे’ असे त्याच्या तोंडून वदवून घेतले. विक्कीविरोधात पोलीस ठाण्यात अनेक प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत. कायद्याचा आणि पोलिसांचा धाक राहील, अशी कठोर शिक्षा या गुंडांना व्हायला हवी, असे परिसरातील काही नागरिकांचे म्हणणे आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

mumbai maximum temperature: मुंबईच्या तापमानात वाढ – mumbai weather : mumbai maximum temperature increases

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईसह राज्याच्या काही शहरांत पहाटे अजूनही किंचितसा गारवा जाणवत असला तरी हळुहळू तापमान वाढत आहे. किमान आणि कमाल तापमान...

MNS-BJP alliance: Nashik: मनसेच्या ‘या’ दोन निर्णयांमुळं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा – bjp mns may form alliance to fight nashik municipal election

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकमहापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र...

shiv sena vs bjp in bmc: शिवसेनेवरचा ‘हा’ आरोप भाजपला भलताच महागात पडला! – maha vikas aghadi parties hit the bjp over distribution of...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईगेल्या वर्षीच्या विकासनिधीचा शिवसेनेकडून गैरवापर झाल्याचा आरोप भाजपलाच महागात पडला आहे. यंदाच्या विकासनिधी वाटपात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि...

Recent Comments