Home महाराष्ट्र thane lockdown: ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात मद्य दुकानांना नकार! - maharashtra lockdown:...

thane lockdown: ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात मद्य दुकानांना नकार! – maharashtra lockdown: wine shops will remain closed in thane district


ठाणे: ठाणे जिल्ह्यातील ६ महापालिका, २ नगरपरिषदा आणि २ नगरपंचायत क्षेत्रामध्ये मद्यविक्रेत्यांचे व्यवहार बंद ठेवण्याचे आणि ग्रामीण भागातील कंटेनमेंट झोन वगळून इतर भागात मद्य विक्रेते त्यांचे व्यवहार चालू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सोमवारी दिला. मॉल्स, बाजारसंकुले आणि बाजारातील सर्व प्रकारची मद्य विक्री दुकाने बंद राहणार आहेत. केवळ ग्रामीण भागातील कॉलनी दुकाने व निवासी संकुलातील दुकानेच खुली राहणार आहेत.

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मद्यदुकाने उघडण्यासंदर्भात निर्णय जाहिर केला. नियमांचे पालन करून केवळ ग्रामीण भागात मद्य दुकाने उघडणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील एकुण बाराशे दुकानांपैकी साधारण २०० च्या आसपास दुकाने उघडू शकणार आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शहरी भागात मद्यदुकाने उघडण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. तर ग्रामीण भागामध्ये नियमांचे पालन करून मद्य मिळवणे शक्य होणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील परवानगी मिळालेल्या मद्य दुकानांमध्ये प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असणार आहे. नोकरांची आणि कामगारांची थर्मल स्कॅनिंग करणे, सर्दी, खोकला अशी लक्षणे असलेल्यांना प्रवेश देऊ नये. तसेच केवळ ५० टक्के मनुष्य बळाला उपस्थित ठेवता येणार आहेत. ग्राहकांनी एकमेकांमध्ये सहा फुटांपेक्षा जास्त अंतर ठेवावे, ग्राहकांची थर्मल तपासणी, प्रत्येक दोन तासांनी दुकानाच परिसर निर्जंतूक करणे, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. सीलबंद मद्यविक्रीसाठी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विक्रीसाठी अट ठेवण्यात आली आहे. एकावेळी ५ पेक्षा जास्त नागरिक दुकानासमोर असू नयेत. तसेच दुकानाच्या दर्शनीभागात नियमावली दर्शवण्यात येणार आहे. यासह विविध फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून मद्यविक्री होऊ शकणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Laxman Gaikwad: ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांचा उदरनिर्वाहासाठी लढा – marathi author laxman gaikwad started fast against maha vikas aghadi government

म. टा. विशेष प्रतिनिधी, गोरेगावगोरेगावच्या चित्रनगरीमध्ये १९९४पासून 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड यांनी उदरनिर्वाहासाठी राज्य सरकारने दिलेल्या जागेवर उपाहारगृह सुरू केले आहे. या जागेचे भाडे...

lord arjuna promise: आस्वाद – dr namdev shastri article on lord arjuna promise and taste

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीसत्य जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत मनुष्यात संशय असतो. आपल्यात संशय आहे, याचा आपल्यालाच संशय येत नसतो, तरीदेखील तो असतो. याचं...

Recent Comments