Home महाराष्ट्र thane police: Thane Police करोना विरुद्ध युद्ध; ठाणे पोलिसांची सर्वात मोठी मोहीम...

thane police: Thane Police करोना विरुद्ध युद्ध; ठाणे पोलिसांची सर्वात मोठी मोहीम – all police in thane city will undergo a health check-up


महेश गायकवाड । ठाणे :
करोना विरोधी लढ्यात अहोरात्र सेवा बजावणाऱ्या ठाणे पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली असून दुर्दैवाने आतापर्यंत तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ही बाब गांभीर्याने घेत पोलीस दलाला करोनामुक्त करण्यासाठी तसेच करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता पोलीस आयुक्तालयात सेवेत असलेल्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या आरोग्य तपासणीला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून १० जुलै पर्यंत ही तपासणी मोहीम सुरू राहणार आहे. पोलिसांची इतकी व्यापक आरोग्य तपासणी प्रथमच होत आहे. ( Thane Police Health Check-up )

वाचा: ठाण्यात करोना रुग्णवाढीचा उच्चांक; CM ठाकरेंनी दिले ‘हे’ निर्देश

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यानंतर या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी पोलीस दलावर येऊन पडली. आजाराचे गांभीर्य नसलेल्या सामान्य जनतेला रस्त्यावर येऊ न देण्याची तसेच लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या गोरगरिबांना अन्नधान्य वाटपासह त्यांना गावी पाठवण्याची जबाबदारी पोलिसांनी यशस्वीरीत्या पार पाडली. करोना विरोधी लढ्यात दिवसरात्र काम करत असताना पोलिसांनाही करोनाची लागण होण्यास सुरुवात झाली. ठाणे शहर पोलिसांबरोबर त्यांच्या मदतीला असलेले राज्य पोलिस दल, रॅपीड अॅक्शन फोर्स, होमगार्ड अशा एकूण ४१४ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली. यापैकी ३१३ जणांनी करोनावर मात केली असून अद्यापही १०१ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत. तर, ठाणे पोलीस दलातील ३ पोलिसांचा करोनाने मृत्यू झाला आहे. बरे होण्याचे प्रमाण जवळपास ७५ टक्के आहे.

वाचा: एका आठवड्यासाठी ‘या’ शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू

मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालय, भारतीय जैन संघटना, देश अपनाये आणि क्रेडाई एमसीएचआय यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे पोलिस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. पोलिस ठाण्यात तसेच कार्यालयात जाऊन ही तपासणी होणार आहे. करोना सदृष्य लक्षणे आढळलेल्या कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेऊन मोफत तपासणी केली जाणार आहे.

३६५ कर्मचाऱ्यांची तपासणी

शुक्रवारी ठाणे पोलिस आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तपासणी शिबिरात पोलिस अधिकारी, कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारी तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील कर्मचारी अशा एकूण ३६५ कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातील २५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या शिबिराचे उद्घाटन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते झाले.

वाचा: आज राज्यात ५ हजार बाधित सापडले, रुग्ण संख्या दीड लाख पार, १७५ दगावलेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad man get jailed for molestation case: विनयभंग करणाऱ्याला वर्षभर कारावास – 40 years man get one year jailed for molestation in nashik

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादचहा टपरी चालविणाऱ्या महिलेला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकाला एक वर्षे कारावास आणि विविध कलमांखाली ५० हजार रुपयांचा...

bcci: Team India : बीसीसीआयचा मोठा निर्णय, ‘ही’ टेस्ट पास केल्याशिवाय खेळाडूंना संघात प्रवेश नाही – bcci took major decision on indian players fitness...

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर भारतीय खेळाडूंचा फिटनेस सर्वांनीच पाहिला. भारताचे खेळाडू एकामागून एक दुखापतग्रस्त होत गेले. त्यामुळेच आता बीसीसीआयने एक मोठा निर्णय...

Recent Comments