Home ताज्या बातम्या TikTok ने प्रोफाईल फोटोमध्ये लावला भारताचा झेंडा, भडकलेले नेटकरी म्हणाले ‘RIP’ tiktok...

TikTok ने प्रोफाईल फोटोमध्ये लावला भारताचा झेंडा, भडकलेले नेटकरी म्हणाले ‘RIP’ tiktok use indian flag in its profile photo users reacted angry mhrd | News


आधीपासून TikTok वर बंदी घालण्यात यावी अशी मागणी आहे. अशा परिस्थितीत प्रोफाईल फोटोवर भारताचा झेंडा लावल्याने नेटकरी चिडले आहेत.

नवी दिल्ली, 28 जून : चीनच्या सगळ्यात लोकप्रिय अशा शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप टिकटोकने (TikTok) सर्व सोशल मीडियावर असलेल्या प्रोफाईलला (profile photo) भारताच्या झेंड्याचा फोटो लावला आहे. याआधी फेसबुक (facebook) आणि ट्विटरवर (twitter) फक्त त्यांच्या प्रोफाइल फोटोमध्येच टिकटॉकचा लोगो दिसत होता, पण आता या दोन्ही ठिकाणी लोगोच्या उजव्या बाजूला भारताचा झेंडादेखील दिसतो आहे.

एकीकडे भारत आणि चीनमधील तणाव त्यात चीन वस्तू आणि अॅपवर घालण्यात आलेली बंदी जोर धरत आहेत. त्यामुळे लोगाच्या ठिकाणी भारताचा झेंडा लावल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आधीपासून TikTok वर बंदी घालण्यात यावी अशी मागणी आहे. अशा परिस्थितीत प्रोफाईल फोटोवर भारताचा झेंडा लावल्याने नेटकरी चिडले आहेत. TikTokच्या ऑफिशिअल पेजवर 1.5 कोटी पेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत. शनिवारी संध्याकाळी अॅपचा प्रोफाईल फोटो बदलण्यात आला आहे.

TikTokने प्रोफाईल फोटोमध्ये झेंडा लावल्यामुळे नेटकरी प्रचंड चिडले आहेत. फेसबुकच्या प्रोफाईल फोटोवर बर्‍याच वापरकर्त्यांनी ‘RIP’ लिहून कमेंट्स केल्या आहेत. खरंतर, लडाखमध्ये झालेल्या एलएसीवरील वाढत्या ताणामुळे बर्‍याच भारतीयांनी स्मार्टफोनमधून अनेक चिनी अ‍ॅप्स डिलीट केले आहेत. त्याचा फटका चीनला बसत आहे. त्यामुळे भारतीयांची समजूत काढण्याची चीन असे प्रकार करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

संपादन – रेणुका धायबर

Tags:

First Published: Jun 28, 2020 02:37 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

illegal sand mining: Illegal Sand Mining: वाळू माफियांच्या टोळीत भाजप नगरसेवक; पोलिसांवर डंपर घालण्याचा प्रयत्न – illegal sand mining case filed against 12 including...

जळगाव: धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील गिरणा नदी पात्रात धरणगाव पोलिसांनी पहाटे अडीच ते साडेपाचच्या दरम्यान सापळा रचून वाळू माफियांच्या टोळीवर धडक कारवाई केली...

Manohar Lal Khattar: ‘शेतकऱ्यांना MSP बाबत कुठलीही अडचण आली, तर राजकारण सोडून देईन’ – manohar lal khattar targets punjab cm captain amarinder singh on...

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात ( farm laws) शेतकऱ्यांनी मोर्चा ( farmers protest ) उघडला आहे. आता त्यावरून राजकार रंगलं आहे. पंजाबचे...

ms dhoni: महेंद्रसिंग धोनीने पार्टीमध्ये केला भन्नाट डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल… – indian former captain ms dhoni dance in a party, chennai super kings’...

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीला आपण सर्वच कॅप्टन कूल म्हणून ओळखतो. त्यामुळे धोनीला आतापर्यंत कोणत्याही पार्टीमध्ये तुम्ही नाचताना पाहिले नसेल. पण धोनीचा एक...

Recent Comments