Home ताज्या बातम्या Tiktok वर बंदीनंतर धुळेकर स्टार उद्धवस्त; म्हणाला, "माझ्या दोन्ही बायका ढसाढसा रडल्या"...

Tiktok वर बंदीनंतर धुळेकर स्टार उद्धवस्त; म्हणाला, “माझ्या दोन्ही बायका ढसाढसा रडल्या” We are devastated my wives cried dinesh pawar TikTok stars in Maharashtra after tiktok ban mhpl | National


धुळे, 01 जुलै : आपण स्टार व्हावं, सेलिब्रिटी व्हावं, आपलेही चाहते असावेत असं प्रत्येकाला वाटतं आणि हे स्वप्नं साकार केलं ते टिकटॉकने. भारतातील सर्वाधिक पसंतीतंच टिकटॉक अॅप. याने फक्त शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागालाही वेड लावलं. ग्रामीण भागातील लोकंही टिकटॉकवर स्टार झाले, इतकीच नव्हे तर बहुतेकांनी कमाईही केली. मात्र आता भारतात टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर या स्टार्सवर मोठं संकट कोसळलं आहे. अशाच स्टार्सपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील दिनेश पवार.

धुळ्यात राहणारे दिनेश पवार आपल्या दोन बायकांसह टिकटॉक स्टार झाले. पवार आणि त्याच्या दोन पत्नी 90 च्या दशकातील बॉलीवूड गाण्यांवर डान्स करायचे. या व्हिडीओमुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. शिवाय त्यांनी 30 लाख रुपयांची कमाई केली. टिकटॉकवर बंदीनंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी आपण आता उद्धवस्त झाल्याचं म्हटलं आहे.

द प्रिंटशी बोलताना दिनेश म्हणाले, आम्ही आता उद्धवस्त झालो, मात्र अशी परिस्थिती फक्त आमचीच नाही हे आम्हाला समजलं. माझ्या दोन्ही पत्नींनी ही बातमी पाहिली आणि त्या रडूच लागल्या. आमच्यासारख्या लाखो लोकांना असंच दु:ख झालं असणार. आता आम्ही युट्युबर आमचे व्हिडीओ बनवण्याचा निर्णय घेतला आहे”

दरम्यान दिनेश यांनी टिकटॉक व्हिडीओतून पैसे कमावल्याचं नाकारलं आहे, मात्र आपल्याला बरीच प्रसिद्धी मिळाली होती. असं त्यांनी सांगितलं.

गेल्या काही दिवसांमध्ये Tik Tok हे भारतात प्रचंड लोकप्रिय झालं आहे. देशातले अनेक तरुण Tik Tokच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करत असून ते सेलिब्रिटीही झाले आहेत. आता देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत या App वर बंदी घातल्याने या स्टार्सचं काय होणार असा प्रश्न विचारला जातोय.

अनेक युवकांनी तर नोकरी सोडून असे व्हिडीओ तयार केले आहेत. त्यातून त्यांना लाखोंची कमाईसुद्धा झाली आहे. या युवकांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे या युवकांना अनेक कंपन्या स्पॉन्सरही करत आहेत. त्याचबरोबर त्यांना जाहिरातीसुद्धा मिळत आहेत. आता या तरुणांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

संपादन – प्रिया लाड

First Published: Jul 1, 2020 08:42 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Madhya Pradesh: madhya pradesh: अंधश्रद्धेचा बळी; जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलाची झोपेतच केली हत्या – human sacrifice woman allegedly axed her 24 year old son...

पन्ना: मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. जन्मदात्या आईनेच झोपेत असलेल्या मुलाची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. मी देवीचा अवतार...

environmental activists: वाशी डेपोचे काम थांबवा! – environmental activists demands stop vashi depot development project work to cm uddhav thackeray and aditya thackeray

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबईनवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचा बहुप्रतिक्षित प्रकल्प म्हणून वाशी डेपोच्या विकास प्रकल्पाकडे बघितले जाते. या ठिकाणी २१ मजल्यांचा टॉवर...

coronavirus in Nashik: हलगर्जीपणा ठरेल घातक! – negligence regarding health would be dangerous says expert

म. टा. प्रतिनिधी, नाशिकएकीकडे करोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने भीतीचे सावट दूर होत असले, तरी सकाळी उकाडा, दुपारी मुसळधार पाऊस, सायंकाळी गारवा या...

Recent Comments