Home शहरं अहमदनगर trupti desai: Indurikar Maharaj: इंदोरीकरांविरुद्ध खटला हा सत्याचा विजय- तृप्ती देसाई -...

trupti desai: Indurikar Maharaj: इंदोरीकरांविरुद्ध खटला हा सत्याचा विजय- तृप्ती देसाई – trupti desai’s reaction on court case against indurikar maharaj


अहमदनगर: ‘इंदोरीकर महाराजांवर संगमनेरच्या न्यायालयात दाखल झालेला खटला हा सत्याचा विजय आहे. उशिरा का होईना हे सत्याचा विजय झाला आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई यांनी दिली आहे.

आणखी वाचा: सुटले म्हणता, म्हणता इंदोरीकर महाराज पुन्हा अडकले!

सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो आणि विषम स्थितीला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य एका कीर्तनात केल्यामुळं निवृत्ती महाराज देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज वादात सापडले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भूमाता ब्रिगेडसह अन्य काही संघटनांनी केलेल्या पाठपुराव्यामुळं अखेर इंदोरीकरांच्या विरोधात खटला दाखल झाला आहे. संगमनेर तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा खटला दाखल करण्यात आला असून आजपासून यावर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा: मराठा, शीख रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या का; सेनेचा सवाल

‘इंदोरीकर हे त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करण्यासाठी प्राचीन ग्रंथांचा आधार घेत होते. मात्र, पुत्रप्राप्तीचा सल्ला देणं हा पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यामुळं कधी ना कधी त्यांच्यावर गुन्हा दाखल होणारच होता, तो आज झाला. हा गुन्हा दाखल व्हावा. त्यांच्या कीर्तनातून वारंवार महिलांचा जो अपमान केला जातो, या प्रकरणी कारवाई व्हावी, अशी माझ्यासह इतर संघटनांची आग्रही मागणी होती. मात्र, राजकीय दबावापोटी व काही व्यक्तींमुळं इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत होती. लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी या प्रकरणाला वारकरी संप्रदायाशी जोडलं गेलं. हिंदुत्वाशी जोडलं गेलं. गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आग्रही असलेल्या संघटनांची बदनामी केली गेली. मात्र, अखेर सत्याचा विजय झाला,’ असं देसाई म्हणाल्या. ‘आता कोर्टात सुनावणी होईल. इंदोरीकरांची चौकशी होईल आणि लवकरच सत्य समोर येईल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा: पडळकरांच्या पवारांवरील टीकेबाबत शिवसेनेला ‘ही’ शंका

Live: राज्यात आतापर्यंत ७७ हजार रुग्ण करोनामुक्त

maharashtra timesSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

corona vaccination in mumbai: निर्धारित वेळेत उद्दिष्टपूर्ती कठीण? – first phase of corona vaccination will be not complete on time due to technical problem

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठीचे कोविन अॅप मुंबईतील काही लसीकरण केंद्रांमध्ये शुक्रवारी सुरळीत सुरू झाले असले, तरीही अद्याप ग्रामीण भागामध्ये ते...

Recent Comments