Home महाराष्ट्र Tukaram Mundhe: मी ना लबाड, ना खोटारडा; चोख प्रत्युत्तर - i am...

Tukaram Mundhe: मी ना लबाड, ना खोटारडा; चोख प्रत्युत्तर – i am neither a liar nor a liar says tukaram mundhe


म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

‘मी ना लबाड आहे, ना खोटारडा. मी कधीही काल्पनिक बाबींवर निर्णय घेत नाही. करोना काळात केलेल्या उपाययोजनांचे परिणाम तुम्हा सर्वांसमोर आहेत. मी सदैव अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवत काम केले. अपयशी झालो असतो तर, जबाबदारीही स्वीकारली असती’, असे ठणकावत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मागील चार दिवसांच्या टीकेला संयमी, खंबीर आणि चोख प्रत्युत्तर दिले.

चौफेर वैयक्तिक टीका सहन केल्यानंतरही मुंढे शुक्रवारी शांतपणे सभागृहाला सामोरे गेले. उत्तराला उभे राहिल्यानंतर नगरसेवकांनी वारंवार अडथळे आणल्याने ते काहीसे नाराजही झाले. मात्र, निग्रही भूमिका घेत स्वत:वरील सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले. ‘पैसे नाहीत, मनपाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने कामे होणार नाहीत’, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आयुक्त मुंढे यांनी सभागृतील प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. नगरसेवकांच्या अडथळ्यांची शर्यत पार करीत किमान सव्वा तास त्यांनी कामाची माहिती दिली. तरीही, काही प्रश्न अनुत्तरीत असल्याने महापौरांनी त्यांना ६ जुलैपर्यंत लेखी निवेदन देण्याचे निर्देश दिले. लबाड, खोटारडा व अन्य शब्दप्रयोगांनाही मुंढे यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. ‘करोना काळात मी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त यांच्याशी समन्वय ठेवला. राज्याच्या मुख्य सचिवांशी मी सातत्याने संपर्कात होतो. दोन महिने सकाळी ८ ते ११.३० वाजेपर्यंत रोज स्वत: प्रत्यक्ष शहरात फिरून माहिती घेतली. दुपारी १२ वाजता आदल्या दिवशी काय झाले, त्याचा आढावा घेतानाच रात्री ११ वाजता दिवसभर काय झाले, काय करायचे याबद्दल बैठक घेतली’, या शब्दांत त्यांनी दिनक्रमाचा आढावा सादर केला. महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत आहे. थकलेली बिले द्यायला निधी नाही. २,१२१ कोटी रुपयांचे महापालिकेवर दायित्व आहे. नवीन कामे घेऊन महापालिकेवर आर्थिक बोजा, दायित्व वाढविणे शक्य नाही. जी कामे अडली आहेत, ती पैसे नसल्याने थांबली आहेत, असे ते म्हणाले. आजपर्यंत महापालिकेत झालेली कामे पूर्णत: नियमानुसारच असल्याचा ठाम दावा त्यांनी केला.

श्रेय घेतले नाही…

‘मी कधीच कामाचे श्रेय घेतले नाही. १ एप्रिल रोजी वॉररूमच्या बैठकीत कर्मचाऱ्यांना संबोधित करीत असताना ‘तुम्ही प्रयत्न करा, यश आले तर तुम्हा सर्वांचे. अपयश आले तर ते माझे’, असे सांगितले होते. त्यामुळे मी श्रेय लाटतो, हे म्हणणे चुकीचे आहे, असे मुंढे म्हणाले.

दारूबाबतचा निर्णय राज्यानेही स्वीकारला

राज्याने दारूविक्रीसंदर्भात परिपत्रक काढल्यानंतर मी ते शहरात लागू केले नाही. संसर्ग वाढू शकतो म्हणून मी ती परवानगी नाकारली होती. इतर शहरांतील विरोधी चित्र बघून शेवटी राज्यानेही आधीचा निर्णय बदलवत ऑनलाइन विक्रीचा पर्याय निवडला, याकडे आयुक्तांनी लक्ष वेधले.

महासभेचे निर्णय

-नगरसेवकांनी डॉ. गंटावार पती-पत्नीवर केलेल्या आरोपांची तपासणी करण्यासाठी एक चौकशी समिती नियुक्त केली. समितीचा अहवाल येईपर्यंत तत्काळ प्रभावाने गंटावार दाम्पत्याला निलंबित करण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.

-महापालिकेच्या महासभेत अनेक नगरसेवकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर आरोप केले. त्या आरोपांचे स्पष्टीकरण तीन दिवसांच्या आत सभागृहात द्यावे.

-केटीनगर परिसरातील विकासकामांचे तुकडे पाडण्यात आले. त्याची माहिती स्थायी समितीपासून का लपवून ठेवण्यात आली, याचे स्पष्टीकरण द्यावे.

-आयुक्तांनी सोशल मीडियातून महापालिका आणि लोकप्रतिनिधींची बदनामी करणारे वक्तव्य केले. प्रसारण करताना सभागृहाची परवानगी घेतली नाही. नियम व शिस्तीचा भंग केला आहे. याचे तीन दिवसांत स्पष्टीकरण द्यावे.

-आयुक्तांनी सक्षम प्राधिकरणाची मान्यता न घेता, अनेक पदांवर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्या रद्द कराव्या आणि असे का केले त्याचे स्पष्टीकरण द्यावे.

-आयुक्तांनी शनिवार, रविवारला लागून सुटी घेतली आहे. त्यासाठी स्थायी समितीची अनुमती गरजेची असताना त्यांनी ती घेतली नाही. त्याचा खुलासा करावा.

तक्रारीची चौकशी

महापालिका आयुक्तांनी गैरव्यवहार केलेल्या तक्रारीची दखल घेत आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, तक्रार दाखल झाल्यानंतर दोन दिवस याची प्रतच आर्थिक गुन्हेशाखेकडे पोहोचली नव्हती. स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाची मंजुरी व अधिकार नसताना आयुक्त मुंढे यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी संगनमत करून कंत्राटदारांना १८ कोटींची रक्कम अदा करीत गैरव्यवहार व फसवणूक केली, अशी तक्रार महापौर संदीप जोशी यांनी सदर पोलिस स्टेशनमध्ये केली होती.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Road Accidents in India: हा तर निव्वळ आत्मघात – road accidents after lockdown in india

करोनामुळे देशभरात वाहतूक मंदावली होती आणि त्यामुळे अपघात व अपघाती मृत्यूंची संख्याही कमी झाली होती. मात्र, आता टाळेबंदी संपल्यानंतर पुन्हा रस्तेअपघातांचे प्रमाण करोनापूर्व...

Recent Comments