Home शहरं नागपूर tukaram mundhe leaves nmc: महापालिकेच्या सभेत आयुक्त मुंढे यांच्यावर आरोपांच्या फैरी, आयुक्त...

tukaram mundhe leaves nmc: महापालिकेच्या सभेत आयुक्त मुंढे यांच्यावर आरोपांच्या फैरी, आयुक्त सभा सोडून निघाले – nagpur civic chief tukaram mundhe leaves nmc gb meet


नागपूरः महापालिकेतील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाचा आज भडका उडाला. नागपुर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना सभा घेण्याचे आदेश राज्यशासनाने दिले होते. शनिवारी सकाळी सुरू झालेल्या या सभेत विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून आयुक्त तुकाराम मुंढे यांना धारेवर धरले. त्यामुळं नाराज झालेले तुकाराम मुंढे सभागृहातून निघून गेले.

महापालिकेतील लोकप्रतिनिधी, आयुक्तांच्या कार्यपद्धतीवरून नाराज आहेत. त्यांनी वारंवार तसे बोलून दाखविले. नगरसेवकांच्या अग्रक्रमाची कामे होत नाहीत. विकासकामे थांबवली, सन्मान मिळत नाही, निर्णयप्रक्रियेत सहभाग नाही, अशी तक्रारींची जंत्री आहे. यासंदर्भातले सवाल विचारण्यासाठी महासभा बोलवा, ही नगरसेवकांची मागणी होती. महापौर संदिप जोशी यांच्या उपस्थितीत १ वाजता सभा सुरू झाली.

आरोपांची उत्तर देत असताना विरोधकांनी थांबवल्यानं मुंढे यांनी सभागृह सोडल्याचं सांगण्यात येत आहे. भाजप नेते दयाशंकर तिवारी यांनी आयुक्त बोलत असताना गोंधळाला सुरूवात केली. त्यानंतर ‘नगरसेवक मध्ये बोलणार असतील तर मी इथं बसणार नाही.’ असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. तसंच, तुमचे नाव संत तुकारामांच्या नावावरून आहे त्याचा तरी मान ठेवा, असं नगरसेवक हरीश ग्वालबांशी यांनी म्हटल्यावर तुकाराम मुंढे सभागृहातून बाहेर पडले. सभागृह सोडल्यानंतर १५ मिनिटांसाठी सभा तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर सभा पुन्हा सुरू केल्यानंतर मुंढे पुन्हा सभागृहात उपस्थित राहिले नाही तर नगरसेवक त्यांच्यावर कारवाई करतील असा ईशारा देण्यात आला.

‘आयुक्त नियमबाह्य कामे करीत आहेत. आपले पितळ उघडे पडू नये म्हणून ते महासभेपासून पळत काढत होते. असा आरोप प्रवीण दाटके आणि दयाशंकर तिवारी यांनी केला. तसंच, स्मार्ट सिटी प्रकल्पात सुरू असलेल्या गोंधळावर बोट ठेवत अनेक गंभीर आरोप केले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

BMC water supply: मुंबईतील पिण्याचे पाणी बाटलीबंद पाण्यापेक्षाही शुद्ध – jal nirmalta award to mumbai municipal corporation by indian water works association

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबई महापालिका पुरवठा करत असलेले पाणी हे खासगी बाटलीबंद कंपन्यांच्या पाण्यापेक्षाही शुद्ध आहे, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे....

act fibernet 300 mbps plan: 300 Mbps प्लान मध्ये JioFiber आणि Airtel Broadband पेक्षा ‘हा’ प्लान खूप स्वस्त, पाहा डिटेल्स – act fibernet 300...

नवी दिल्लीः भारतात Broadband इंटरनेटची डिमांड वाढत आहे. लोकांना हायस्पीड इंटरनेट सोबत अनलिमिडेट डेटाची गरज पूर्ण करण्यासाठी सर्वच ब्रॉडबँड प्लानवर जोर देत आहे....

new parliament building: हा आमुचा मार्ग बिनभुयाराचा… – jata jata by chakor : new parliament building features underground tunnels in building for pm and...

अरेरे! काय हे आमचे नशीब! काय हा दैवदुर्विलास! (या शब्दाचा अर्थ काय ते आम्हाला अद्यापि कळलेले नाही. शाळेत शिकलेले मोजके शब्द स्मरणात राहिले....

raj thackeray: राज ठाकरे ‘नाणार’ प्रकल्पाच्या बाजूने; स्थानिक म्हणतात… – nanar refinery opposing leaders reaction after raj thackeray writes open letter to cm thackeray...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईनाणार रिफायनरीला स्थानिक दलाल, गुजराती-मारवाडी गुंतवणूकदार, मुंबई, बांद्रा-बीकेसीसारख्या डायमंड मार्केटमधील भाजपप्रणित व्यापारी यांचे समर्थन असून नाणार कंपनीचे अधिकारी या...

Recent Comments