Home शहरं सातारा Udayanraje Bhonsle : पडळकर मला विचारून बोलले नाहीत; पवार आणि ते बघून...

Udayanraje Bhonsle : पडळकर मला विचारून बोलले नाहीत; पवार आणि ते बघून घेतील: उदयनराजे – BJP Leader Udayanraje Bhonsle Reaction On Gopichand Padalkars Statement


सातारा: भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर उठलेल्या वादावर भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या खास तिरकस शैलीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पडळकर मला विचारून बोलले नाहीत. माझं मत मी परखडपणे मांडत असतो. पवार आणि पडळकर त्यांचं ते बघून घेतील, असं उदयनराजे म्हणाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसले यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यापूर्वी त्यांनी त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन सदिच्छा भेट घेतली. कोणी कोणाबद्दल काय बोलले हे ते मला विचारून बोलले नाहीत. माझं मत मी परखडपणे मांडत असतो. शरद पवार आणि पडळकर त्यांचे ते बघून घेतील, असं उदयनराजे म्हणाले. ज्यांनी कुणी टीका केली. त्याबद्दल त्यांनाच विचारलं पाहिजे. कोण काय बोलतो याच्याशी मला घेणं नाही. कुणी मला विचारून बोलत नाही आणि मला विचारूनही कुणई उत्तर देणार नाहीत. माझी मतं मी परखडपणे मांडत असतो, असल्या गोष्टीत आपण पडत नाही, असंही ते म्हणाले.

‘IMPORTANT’ मोदींच्या संबोधनाआधी अमित शहांचं ट्विट!

करोनाचा उगाच बाऊ केला जातोय

यावेळी त्यांनी करोना प्रादुर्भावावरही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. करोनाचा उगाचच बाऊ केला जातो. स्वीडनमध्ये ज्यापद्धतीने हर्ड इम्युनिटी म्हणजे सामाजिक रोगप्रतिकारकशक्ती केली आहे. त्याच पद्धतीने भारतातही करावी. इतर व्हायरसप्रमाणेच हा व्हायरस आहे. त्याचा एवढा काय बाऊ करायचा. इतर आजारातही मृत्यू होतो. त्यामुळे करोनामुळे लोकांना घाबरवू नका, असं आवाहनही त्यांनी केलं. लॉकडाऊनमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना रोजगार नाही. लॉकडाऊन कधी संपणार माहीत नाही. पाऊस सुरू झालाय. त्यामुळे आत किती वेळा लॉकडाऊन करणार? असा सवालही त्यांनी केला.

‘बरे झाले शरद पवारांनी शिवसेनेबरोबर सरकार घडवून आणले’

गेल्या आठवड्यात पडळकरांनी पवारांविषयी अत्यंत वादग्रस्त विधान केलं होतं. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहेत. त्यांनी बहुजन समाजावर नेहमीच अन्याय केला. छोट्या समूहाला भडकवायचं आणि लढवायचं हेच धोरण त्यांनी राबवलं आहे. त्यांनी ६० बहुजन समाजाला झुलवत ठेवून राज्य केलं आहे. गेल्या ६० ते ७० वर्षांत त्यांनी बहुजन नेतृत्वाला पुढे येऊ दिले नाही, असं सांगतानाच पवारांकडे विचारधारा नाही, अजेंडा नाही आणि व्हिजनही नाही, अशी टीका पडळकरांनी केली होती. पवार हे धनगर आरक्षणावर पॉझिटिव्ह असतील असं वाटत नाही. त्यामुळे आम्ही येत्या अधिवेशनात धनगर आरक्षणाचा मुद्दा लावून धरू, असं सांगतानाच करोनाचं संकट गेल्यानंतर धनगर आरक्षणासाठी राज्यभरातील तरुण रस्त्यावर उतरतील, असंही त्यांनी सांगितलं होतं.

या कारणामुळे होतायत सर्वाधिक करोनाबाधितांचे मृत्यूSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pravin Darekar Reaction On Eknath Khadse Resignation – ‘एक गोष्ट मनासारखी झाली नाही म्हणून नाराज होणे योग्य नाही’

सांगलीः 'कोणताच राजकीय पक्ष शंभर टक्के तुमचे समाधान करु शकत नाही. आठ गोष्टी तुमच्या मनासारख्या झाल्या आणि एक झाली नाही म्हणून नाराज होणे...

Prithvi Shaw Mentality Deteriorated, Sunil Gavaskar Erupted – सामना सुरू असताना गावस्कर भडकले; म्हणाले, या खेळाडूची मानसिकता बिघडली

दुबई: IPL 2020आयपीएलच्या १३व्या हंगामात भारतीय युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. या वर्षी विदेशी खेळाडूंपेक्षा भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. दिल्ली...

Suraj Pe Mangal Bhari Movie Trailer – सूरज पे मंगल भारी ट्रेलर: लोटपोट व्हायला भाग पाडेल मनोज बाजपेयी आणि दिलजीत दोसांजचा कॉमक अंदाज

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून मनोज बाजपेयी, दिलजीत दोसांज आणि फातिमा सना शेख यांच्या आगामी 'सूरज पे मंगल भारी' सिनेमाची चर्चा होती. यंदा दिवाळीत...

Recent Comments