Home शहरं सातारा udayanraje bhosale on coronavirus: एखादाच माझ्या सारखा असतो त्याला मरण नसतंः उदयनराजे...

udayanraje bhosale on coronavirus: एखादाच माझ्या सारखा असतो त्याला मरण नसतंः उदयनराजे भोसले – bjp leader udayanraje bhosale talking about coronavirus


साताराः ‘प्रत्येक मृत्यू हा करोनामुळंच होतो असे नाही. जो जन्मला आलाय त्याला एक दिवस मरायचंच आहे. एखादाच माझ्यासारखा असतो ज्याला मरण नसतं,’ ही प्रतिक्रिया आहे भाजप नेते उदयनराजे भोसले यांची. राज्यात उद्भवलेल्या करोनारुपी संकटावर भाजप नेते आणि साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी मत मांडले आहे.

‘सध्या करोना हा विषय खूप मोठा करण्यात आला आहे. मृत्यू कोणाच्या हातात नाही. जो मरणार तो मरणार आणि जो जगणार तो जगणार प्रत्येक मृत्यू हा करोनामुळंच होतो, असे नाही. नागरिकांनी व्हायरसला घाबरुन न जाता वस्तुस्थितीला सामोरं गेलं पाहिजे. काळजी घेतली पाहिजे,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे.

वाचाः मृतदेहाला आंघोळ, दफनविधीला गर्दी आणि पुढे काय घडलं पाहा

‘व्यवसाय बंद असल्यानं लोकांमध्ये उद्रेक झाला तर तो कसा थांबवणार? करोनाबाबत आयुर्वेदिक उपचाराचा विचार शासनाने केला पाहिजे. तसंच, राज्यातील लॉकडाऊन उठवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.’ करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणही तापल आहे. यावरही उदयनराजे भोसले यांनी भाष्य केलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त विधानामुळं राज्यभर त्याचे पडसाद उमटले होते. गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर केलेल्या विधानाबाबत उदयनराजे यांना प्रश्न विचारला त्यांनी मला विचारू नका असं म्हटलं आहे. कोणी कोणाबद्दल काय बोललं हे त्यांनी मला विचारुन बोलले नाही. तसंच, जे कुणी उत्तर देणार आहेत, ते मला विचारून देणार नाहीत. माझं मत परखडपणे मांडत असतो. त्यामुळं शरद पवार आणि गोपीचंद पडळकर बघून घेतीलं, असं ते म्हणाले आहेत.

वाचाः मुंबईत दोन दिवस मुसळ’धार’; घरातच थांबा; पोलिसांच्या सूचनाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health minster rajesh tope: चाचण्यांसाठी पुन्हा दरकपात – maharashtra goverment again reduced price of corona test

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबईसह राज्यात करोना चाचणीसाठी आता ९८० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली...

Lasalgaon onion market: मुंबई बाजारात कांद्याची आवक घटली – onion imports declined in mumbai due to onion auction close in lasalgaon onion market

म. टा. वृत्तसेव, नवी मुंबईकांद्याची मर्यादेपेक्षा अधिक साठवणूक करणाऱ्या साठेबाजांवर धाडी पडण्यास सुरुवात झाल्यानंतर, कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये लिलाव बंद पडले आहेत....

Recent Comments