Home शहरं मुंबई Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा समावेश देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत - maharashtra chief...

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा समावेश देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत – maharashtra chief minister uddhav thackeray most most popular cm; rating over 76. 53


मुंबईः उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर काही महिन्यातच राज्यात करोनाचे संकट ओढावलं. या कठिण परिस्थीतही करोनासारख्या महामारीचा सामना करणाऱ्या ठाकरे सरकारच्या कामाची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. एका सर्वेक्षणातून उद्धव ठाकरे देशातील देशाच्या सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पाचव्या स्थानी आहेत.

सी व्होटर या संस्थेनं केलेल्या एका सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता ७६. ५३ टक्के आहे. तीन महिन्यांपूर्वी प्रचंड बहुमतानं निवडून आलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा ठाकरेंची लोकप्रियता अधिक आहे. अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता ७४ टक्के इतकी आहे. म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्यानंतर केजरीवाल यांचा नंबर लागतो.

‘उद्धव ठाकरे हे बहुधा पहिलेच असे मुख्यमंत्री असतील’

सी व्होटर संस्थेनं देशातील इतर नेत्यांच्या लोकप्रियतेचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६६ टक्के लोकांनी पसंती दर्शवली तर, २३. २१ टक्के लोकांनी राहुल गांधींच्या पारड्यात मतं टाकली.

मुंबा देवीची कृपा… मुख्यमंत्र्यांनी मानले सर्वांचे आभार

विधानसभा निवडणुकीनंतर सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपशी युती तोडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे यांच्याकडं नव्या आघाडीचं मुख्यमंत्रिपद आलं. उद्धव ठाकरे यांच्याकडं संसदीय कामकाजाचा कसलाही अनुभव नव्हता. विधिमंडळाच्या सभागृहाचे ते साधे सदस्यही नव्हते. त्यामुळं त्यांच्यासाठी सगळं काही नवीन होतं. अत्यंत कठीण परिस्थितीत मुख्यमंत्रिपदी आलेल्या उद्धव ठाकरे यांनी हळूहळू कामकाज समजून घ्यायला सुरुवात केली होती. तोच कोविडच्या रूपानं साथीच्या रोगाचं संकट आलं. मुंबईत याचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला असून देशात कोविडचे सर्वाधिक रुग्ण आहेत. या परिस्थितीला गेल्या दोन महिन्यांपासून उद्धव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार तोंड देत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Narendra Modi To Visit Punes Serum Institute Of India On Saturday – PM Modi: करोनावरील लस केव्हा येणार?; PM मोदींच्या पुणे दौऱ्याकडे देशाचे लक्ष

पुणे: अवघा देश करोनावरील लसीच्या प्रतीक्षेत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या दिशेने वेगवान पावले टाकायला सुरुवात केली आहे. करोनावरील लसीची सद्यस्थिती जाणून...

sangli crime: Sangli Crime: चुलती व पुतण्याची आत्महत्या; कारण स्पष्ट न झाल्याने गूढ वाढले – sangli crime aunt and nephew commit suicide

सांगली:तासगाव तालुक्यातील हातनूर येथे चुलती आणि तिच्या पुतण्याच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. हा प्रकार गुरुवारी (ता. २५) पहाटे घडला. अनुराधा गणेश सुतार आणि...

Recent Comments