Home शहरं मुंबई Uddhav Thackeray: गणेश मूर्ती उंचीचा निर्णय दोन दिवसांतः मुख्यमंत्री - coronavirus mumbai...

Uddhav Thackeray: गणेश मूर्ती उंचीचा निर्णय दोन दिवसांतः मुख्यमंत्री – coronavirus mumbai cm uddhav thackeray appeal to ganesh mandals


मुंबईः करोना संसर्गाचे सावट यंदाच्या गणेशोत्सवावर आहे. यामुळे मुंबईत नेहमी सारखा गणेशोत्सव यंदा दिसण्याची शक्यता कमी आहे. मुंबईतील करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईतील गणेश मंडळांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत आहेत. यंदा मूर्तीची उंची कमी करू आणि उत्सवाची उंची वाढवू असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सव मंडळांना केलंय, असं मीडिया रिपोर्टसमधून सांगण्यात आलंय.

दोन जणांना उचलता येईल एवढीच मूर्तीची उंची ठेवूया. मूर्तीची उंची कमी करू उत्सवाची उंची वाढवूया, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी गणेश मंडळांना केलं आहे. गणेश मूर्तीच्या उंचीबाबतचा निर्णय पुढच्या दोन दिवसांत होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीही गणेश मंडळांशी संवाद साधल होता. ‘करोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा नेहमीसारखा धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. राज्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून हा उत्सव साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर नवा आदर्श निर्माण करावा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. (Uddhav Thackeray on Ganpati Festival)

राज्यात करोनाचे वाढते रुग्ण

राज्यात करोना संसर्गामुळे १४२ जणांचा मृत्यू झाला तर ३८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. एकाच दिवसातील रुग्णसंख्येचा हा नवा उच्चांक ठरला आहे. राज्यात ५५ हजार ६५१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत तर रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने ५०.४९ टक्के एवढा आहे. शुक्रवारची आकडेवारी आहे. काल १९३५ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. आतापर्यंत एकूण ६२ हजार ७७३ रुग्णांना घरी सोडण्यात आलंय.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

land acquisition cases: भूसंपादन प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी – mns corporater salim shaikh demand for inquiry into land acquisition cases

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीने प्राधान्यक्रम ठरवून मंजूर केलेल्या भूसंपादन प्रकरणांवर मनसेचे नगरसेवक सलिम शेख यांनी आक्षेप घेतला आहे. पहिल्या...

‘लोकहितवादी’चा सन्मान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकहितवादी मंडळास मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीबद्दलचा...

Recent Comments