Home शहरं मुंबई Uddhav Thackeray Speech: 'ते' राजकारण मोडीत काढण्यासाठीच मुख्यमंत्री झालोय: उद्धव ठाकरे -...

Uddhav Thackeray Speech: ‘ते’ राजकारण मोडीत काढण्यासाठीच मुख्यमंत्री झालोय: उद्धव ठाकरे – cm Uddhav Thackeray’s Speech On Shivsena Foundation Day


मुंबई: ‘अन्यायाविरुद्ध लढण्यासाठीच शिवसेनेचा जन्म झाला आहे. शिवसेनाप्रमुखांची तीच परंपरा मी पुढे घेऊन जात आहे. विश्वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही, संस्कृती आहे. पण आपल्यासोबत राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. ते राजकारण मोडीत काढल्यामुळेच मी आज मुख्यमंत्री म्हणून बसलो आहे,’ असं प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनविणार, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवला. (Uddhav Thackeray’s Speech on Shivsena Foundation Day)

वाचा: सीएमच्या पाया पडणारा विरोधी पक्षनेता राज्यानं पाहिलाय; थोरातांचं प्रत्युत्तर

शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी कोविड १९, निसर्ग चक्रीवादळात शिवसेनेनं व सरकारनं केलेल्या कामाबद्दल माहिती दिली. भाजपनं केलेल्या राजकारणावरही त्यांनी भाष्य केलं. ‘शिवसेनेनं विचारधारा बदलेली नाही. पण शिवसेना कुणापुढं लाचारही होणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

‘प्रत्येक संकटात शिवसैनिक धावून जात आहेत. चक्रीवादळ असो की करोनाचे संकट. शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी उभा आहे. शिवसेनेच्या शाखा आता दवाखाने बनल्या आहेत. डॉक्टरांना सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. जिवाची पर्वा न करता शिवसैनिक झटत आहे. शिवसैनिक कधीही संकटाला घाबरणार नाही, डगमगणार नाही. हा शिवसैनिक सोबत असेपर्यंत मला कुणाचीही भीती नाही. शिवसेना हेच एक वादळ आहे, त्यामुळं आम्हाला इतर वादळांची पर्वा नाही,’ असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

मातोश्री

वाचा: नेहरूंना दोष देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; शिवसेनेचा हल्लाबोल

नात्यात अंतर पडू देणार नाही!

‘शिवसैनिक हे माझ्याभोवतीचं कवच आहे, असं शिवसेनाप्रमुख म्हणायचे. हे कवचही आहे आणि त्यांचा वचकही आहे. याच शिवसैनिकांच्या प्रेमाचा ओलावा माझ्या अंगावर आहे. मुख्यमंत्री झाल्यामुळे आपल्यासोबत संपर्क कमी झाला असला तरी मी नात्यात अंतर पडू देणार नाही,’ असा शब्द उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. सर्व शिवसैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देतानाच काळजी घेण्याचं आवाहनही केलं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Anil Deshmukh on Ambani Bomb Scare Case: ‘अँटिलिया’बाहेरील स्कॉर्पिओचं गूढ वाढलं; ATSकडे तपास, ‘ही’ मागणी फेटाळली – ambani bomb scare case investigation handed over...

हायलाइट्स:मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी तपास एटीएसकडे.कारमालकाच्या मृत्यूनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली महत्त्वाची घोषणा.एनआयएकडे तपास देण्याची विरोधी पक्षाची मागणी गृहमंत्र्यांनी फेटाळली.मुंबई:...

LIVE : उदयनराजेंच्या कुटुंबातील लग्न सोहळ्याला राज ठाकरेंसह दिग्गजांची हजेरी | Coronavirus-latest-news

11:32 pm (IST) भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांचे भाचे अतिशराजे पवार यांचा विवाह सोहळा नाशिकमध्ये पार पडला....

Recent Comments