Home शहरं मुंबई uddhav thackeray thanks people: Nisarga: मुंबा देवीची कृपा... मुख्यमंत्र्यांनी मानले सर्वांचे आभार...

uddhav thackeray thanks people: Nisarga: मुंबा देवीची कृपा… मुख्यमंत्र्यांनी मानले सर्वांचे आभार – cyclone nisarga: cm uddhav thackeray thanks all government agencies and people of maharashtra


मुंबई: ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्यातून मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. ‘मुंबईवर मुंबा देवीची कृपा आहे, तसेच पंढरपूरच्या विठू माऊलीचे आशीर्वाद आहेत,’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. (CM Thackeray thanks People)

निसर्ग Live: निसर्ग वादळाचा नगर जिल्ह्यातही फटका

महाराष्ट्र गेल्या दोन महिन्यांपासून कोविडच्या संकटाशी लढत आहे. सुमारे ७० दिवसांच्या लॉकडाऊनमधून बाहेर पडण्याचे प्रयत्न सुरू असतानाच ‘निसर्ग’ चक्रीवादळ (Nisarga Cyclone) महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येऊन थडकले. हे वादळ मुंबईत धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिल्यानं चिंता वाढली होती. मात्र, प्रशासनानं जय्यत तयारी केली होती. आज रत्नागिरी व रायगडच्या किनाऱ्यावर अपेक्षेप्रमाणे हे वादळ धडकले. मात्र, मुंबईत पोहोचण्याआधी वादळानं दिशा बदलली आणि त्याचा वेगही मंदावला. त्यामुळं मोठं संकट टळलं. असं असलं तरी रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाण्यासह अनेक ठिकाणी काही प्रमाणात या वादळाचा फटका बसला. पोलीस, महापालिका प्रशासन, एनडीआरएफ, अग्निशमन दल व अन्य सर्व आपत्कालीन यंत्रणांनी चोख तयारी केल्यानं मोठी हानी टळली.

मुख्यमंत्र्यांनी एका निवेदनाद्वारे सर्वांचे आभार मानले आहेत. ‘वादळाचे हे संकट मोठे होते. पण आपण सगळ्यांनी परतवून लावले आहे. जनता व प्रशासनाने झुंज दिली व संकटाची तीव्रता कमी केली. दुर्दैवाने दोन जीव अपघातात गेले. कोकणात व इतरत्र नुकसानही झालं आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. मुंबा देवीचीच कृपा मुंबईवर आहे, तसे पंढरपूरच्या विठू माऊलींचे आशीर्वादही आहेत. या वादळाला थोपवून सामना करणारे महापालिका अधिकारी, जिल्हा प्रशासन, आपत्कालीन व्यवस्थापन, वैद्यकीय पथके या सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. वृत्तवाहिन्या सुद्धा लोकांना चांगली माहिती देत होत्या,’ असं मुख्यमंत्र्यांनी निवेदनात म्हटलं आहे.

Live: सोलापूरच्या महापौरांना करोनाची लागण

‘निसर्गापुढं कोणाचेही चालत नाही. पण संकट काळात महाराष्ट्र एक आहे. खंबीर आहे हे आज दिसून आले. ही आपली एकजूट महाराष्ट्राला सर्व संकटातून बाहेर काढल्या शिवाय राहणार नाही,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ramchandra Guha Criticize N. Srinivasan And Sourav Ganguli’s Role In Indian Cricket – अमित शहा यांच्याबरोबर कोण चालवंतय बीसीसीआय, रामचंद्र गुहा यांनी केला गंभीर...

मुंबई : राजकारण आणि क्रिकेट यांचा संबंध फार वर्षांपासून येत आला आहे. पण सध्याच्या घडीला भारताचे गृह मंत्री अमित शहा हे बीसीसीआय चालवत...

Recent Comments