Home शहरं मुंबई Uddhav Thackeray: uddhav thackeray : आषाढी वारीला जाणार; करोनाचं संकट निवारण्यासाठी विठ्ठलाला...

Uddhav Thackeray: uddhav thackeray : आषाढी वारीला जाणार; करोनाचं संकट निवारण्यासाठी विठ्ठलाला साकडं घालणार: CM – i am going to ashadhi wari, says uddhav thackeray


मुंबई:

आषाढी वारीसाठी मी पंढरपूरला जाणार आहे. मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर तुमचा प्रतिनिधी म्हणून मी वारीला जाणार आहे. विठ्ठलाचं दर्शन घेऊन करोनाचं संकट संपवण्यासाठी विठूरायाला साकडं घालणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी दोन दिवासांपूर्वीच मुख्यमंत्री करोनाच्या हॉटस्पॉट परिसरात राहत असल्याने त्यांनी यंदा वारीला येऊ नये, असं म्हटलं होतं. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानाला महत्त्व आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आषाढी वारीला जाणार असल्याचं स्पष्ट केलं. २०१० रोजी मी वारीला गेलो होतो. त्यावेळी एरिअल फोटोग्राफीच्या माध्यमातून वारकऱ्यांचं विराट रूप पाहिलं. वारकऱ्यांच्या रुपात खऱ्या अर्थाने विश्वरूप पाहिलं. आताही मी आषाढी वारीला जाणार आहे. आपल्या राज्यात करोनाचं संकट आलं आहे. हे संकट निवारण्याचं साकडं विठूरायाला घालणार आहे. राज्यात काय परिस्थिती निर्माण झाली आहे. लाखो वारकरी आज घरात अडकले आहेत. अनेक चित्रपटांमधून तुझे चमत्कार पाहिले. आता चमत्कार दाखव आणि करोनाचं संकट घालवं, असं साकडं विठूरायाला घालणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर तुमचा प्रतिनिधी म्हणून मी वारीला जाणार आहे, असंही ते म्हणाले.

३० जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही; पण अनेक गोष्टी सुरू होतील: उद्धव ठाकरे

करोना संकटाच्या काळात सण, उत्सवांना उत्सवी स्वरूप न दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी सर्व धर्मीयांचे आभार मानले. सर्वांनी उत्सव सामाजिक भान ठेवून पाळल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं. यावेळी त्यांनी दहीहंडी उत्सव मंडळांचे विशेष आभार मानले. माझी भेट न घेता, चर्चा न करता दहीहंडी मंडळांनी परस्पर निर्णय घेऊन दहीहंडी उत्सव रद्द केला. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. यालाच सामाजिक भान म्हणतात, असं ते म्हणाले.

गणेशमूर्ती चार फूट ऊंचीची

तसेच यंदा करोनाचे संकट आहे. यंदा गणेश मूर्त्यांची उंची अधिक नको. ही ती वेळ नाही. मूर्ती चार फुटापर्यंतच असावी, असं सागंतानाच माझ्यासोबत गणपती उत्सव मंडळांची बैठक झाली. यावेळी त्यांनीही मूर्त्यांची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत चांगला आणि स्तुत्य असल्याचं ते म्हणाले. तसेच यंदा गणेश प्रतिष्ठापना आणि विसर्जनाची मिरवणूक काढू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

फोटोफीचर: दौलत बेग ओल्डी- भारत येथून पिरगाळू शकतो चीनची मान

Live: रक्तदानाप्रमाणेच प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे या; मुख्यमंत्र्यांचं आवाहनSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

GATE 2021 mock test: GATE 2021: मॉक टेस्टसाठी लिंक अॅक्टिव्ह – gate 2021 mock test link for gate 2021 activated on gate iit ac...

GATE 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (IIT Bombay) ने अभियांत्रिकी पदवीधर एप्टीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग (GATE 2021) साठी मॉक टेस्टची लिंक अॅक्टिव्ह...

MNS morcha: पुणे: वाढीव वीजबिलाविरोधात मनसेचा मोर्चा, शहरप्रमुखांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात – mns morcha on electricity bill pune city chief ajay shinde and...

पुणे: वाढीव वीजबिलाविरोधात मनसेच्या आंदोलनाआधीच पोलिसांनी शहरप्रमुख अजय शिंदे यांच्यासह ५०-६० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. फरासखाना पोलीस ठाण्यात त्यांना घेऊन गेले. त्यामुळे आक्रमक झालेल्या...

corona infection from food: अन्नातून करोना संसर्ग; ठोस पुराव्यांचा अभाव – corona infection from food but lack of concrete evidence says infectious diseases clinic...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोनाचा संसर्ग अन्नातून किंवा खाद्य पदार्थातून होण्याविषयी आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. गरम पाणी पिणे किंवा बाहेरून घरी...

Recent Comments