Home आपलं जग करियर UGC: करोनामुळे UGC करणार पुन्हा नवं शैक्षणिक कॅलेंडर जारी - ugc to...

UGC: करोनामुळे UGC करणार पुन्हा नवं शैक्षणिक कॅलेंडर जारी – ugc to come up with revised academic calendar, guidelines for final year exams


विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात UGC उच्च शिक्षण क्षेत्रासाठी अंतिम सत्र परीक्षा, अकॅडमिक कॅलेंडर यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे लवकरच जारी करणार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा जुलै महिन्यात होणार होत्या पण करोनामुळे त्या रद्द केल्या जाण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नव्या शैक्षणिक वर्षासाठी आता यूजीसीला नव्याने कॅलेंडर जाहीर करावं लागणार आहे. नवं शैक्षणिक वर्ष सुरू होण्यासाठी कॉलेजांना ऑक्टोबर महिन्यापर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिलेल्या निर्देशांनुसार हे अॅकेडमिक कॅलेंडर तयार करण्यासाठी यूजीसीने हरयाणा विद्यापीठाचे कुलगुरू आर. सी. कुहाड यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. यापू्र्वी यूजीसीने कॅलेंडर जारी केलं होतं. या कॅलेंडरमध्ये बदल करा, असे निर्देश केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी यूजीसीला दिले आहेत. दरम्यान, पोखरियाल यांनी राज्यांना त्यांच्या परीक्षा रद्द करण्याचेदेखील आवाहन केले आहे. गुजरात सरकारने बुधवारी अंतिम सत्र परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तर दुसरीकडे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि हरयाणा या राज्यांनी त्यांच्या विद्यापीठ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. या राज्यांमधील विद्यार्थ्यांना प्रमोट केले जाणार आहे किंवा त्यांची पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे की जी मार्गदर्शक तत्त्वे आता नव्याने जारी होतील ती देखील विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊनच तयार केलेली असतील. परीक्षा जुलैमध्ये होऊ नयेत अशी एक्पर्ट कमिटीची भूमिका आहे.

रद्द होणार जेईई मेन, नीट परीक्षा? काय म्हणाले मंत्री वाचा…

यापूर्वीच्या कॅलेंडरनुसार जुन्या विद्यार्थ्यांना म्हणजेच जे कॉलेजमध्ये आहेत, त्यांचे शैक्षणिक वर्ष ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार होते, ते आता ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात येण्याची दाट शक्यता आहे. या अनुषंगाने इतर सुट्ट्या, सणवार, कामांचे तास आदी मुद्द्यांवर चर्चा होऊन हे नवे वेळापत्रक तयार होईल. कोविड – १९ च्या ताज्या परिस्थितीचाही आढावा घेण्यात येईल.

UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलता येणार

शाळा ३१ जुलै पर्यंत बंदच

दरम्यान, देशभरातील शाळा ३१ जुलै पर्यंत प्रत्यक्ष बंदच राहणार असून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण या कालावधीत सुरू राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाचे तशा सूचना दिल्या आहेत. २९ जून रोजी अनलॉक – २ ची घोषणा झाली. हा कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आला. या काळात शाळा प्रत्यक्ष उघडण्यात येणार नाहीत. देशातील सर्व शाळा-महाविद्यालये १६ मार्चपासून बंद आहेत. जुलैमध्ये संबंधितांची बैठक घेऊन त्यानंतरच शाळांसंदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sushant Singh Rajput Case Dipesh Sawant Demands Ncb For 10 Lakh Compensation – सुशांत केसः दिपेश सावंतची मागणी; NCB वर गंभीर आरोप करत मागितले...

मुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर आतापर्यंत २२ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक...

nokia 2 v tella: दोन दिवस बॅटरी लाईफचा नोकियाचा नवा स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत – nokia 2 v tella with mediatek helio a22 soc,...

नवी दिल्लीः HMD ग्लोबल ने नवीन नोकिया स्मार्टफोन Nokia 2 V Tella लाँच केला आहे. हा कंपनीचा नोकिया २ व्हीचे अपडेट मॉडल आहे....

LIVE : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पावसाला सुरुवात | National

पाऊस BREAKING : पिंपरी चिंचवड- शहर परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात  पुण्यातही दमदार पावसाची हजेरी पुढील 3 ते 4 तासांमध्ये पुण्यासह महाराष्ट्रातील इतर 10 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा...

assam rifles: अरुणाचल प्रदेशात आसाम रायफल्सच्या टीमवर हल्ला, जवान शहीद – assam rifles team ambushed jawan killed in arunachal pradesh

इटानगर : अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) आसाम रायफल्सच्या (Assam Rifles) पॅट्रोल टीमवर हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय....

Recent Comments