Home विदेश UN appreciate India: Coronavirus India वेल डन इंडिया! भारताच्या लसपुरवठ्याचे संयुक्त राष्ट्राकडून...

UN appreciate India: Coronavirus India वेल डन इंडिया! भारताच्या लसपुरवठ्याचे संयुक्त राष्ट्राकडून कौतुक – un chief voices appreciation for india’s leadership in fight against covid-19, vaccine assistance


जीनिव्हा: कोव्हिड प्रतिबंधक लस जागतिक बाजारपेठेत उपलब्ध करण्याच्या आणि जागतिक पातळीवर कोव्हिडविरुद्ध लढ्याचे नेतृत्व केल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुट्रेस यांनी भारताचे कौतुक केले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेसाठी भारताने करोना प्रतिबंधक दोन लाख डोस पुरविले आहेत. त्याबद्दल गुट्रेस यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र पाठवून आभार व्यक्त केले आहेत. त्यांचे पत्र भारताचे संयुक्त राष्ट्रांमधील कायमस्वरुपी प्रतिनिधी टी. एस. तिरुमूर्ती यांनी ट‌्वीट केले आहे. ‘करोनाचा मुकाबला करण्याच्या लढ्यात भारत हा जागतिक नेता आहे. भारताने कोव्हिड काळात सुमारे १५० देशांना औषधे, तपासणी साहित्य, व्हेंटिलेटर्स आणि पीपीई कीटचा पुरवठा केला आहे. करोना प्रतिबंधक दोन लशी भारताने विकसित केल्या आहेत आणि त्यांचे उत्पादनही केले आहे. या दोन्ही लशींना जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरयोग्य म्हटले आहे. त्याचा पुरवठाही जागतिक बाजारपेठेत सुरू आहे. अधिकाधिक देशांना लस मि‌ळ‌ावी यासाठी संघटनेच्या कोव्हॅक्स मोहिमेलाही भारताने सातत्याने पाठिंबा दिला आहे,’ असे या पत्रात गुट्रेस यांनी नमूद केले आहे.

वाचा: करोनाचे थैमान: जगातील २० टक्के करोनाबाधितांचे मृत्यू ‘या’ देशात!
वाचा: करोनाबाधित ओळखण्यासाठी ऑक्सिमीटर निरुपयोगी?

शांतिसैनिक ज्या कठीण प्रसंगात काम करीत असतात त्याचा विचार करून भारत या सैनिकांसाठी करोना प्रतिबंधक दोन लाख डोस देणार असल्याचे ट‌्वीट परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी बुधवारी केले होते. या लशीचे दोन डोस सैनिकांना देण्यात येणार आहेत. सध्या जगात ९४ हजार ४८४ शांतिसैनिक असून, १२ मोहिमा सुरू आहेत. या सैनिकांना पुरेसे होतील एवढे डोस भारताने दिले आहेत.

वाचा: ‘टाइम’च्या उदयोन्मुख नेत्यांच्या यादीत चंद्रशेखर ‘रावण’; ‘या’ पाच भारतीयांचाही समावेेश

दरम्यान, करोनाच्या थैमानाने हतबल झालेल्या जगाला दिलासा देणारी बातमी इस्रायलने दिली आहे. इस्रायलमध्ये करोना लसीकरण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या लसीकरणामुळे करोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवले असल्याचे चित्र आहे. फायजर-बायोएनटेकने विकसित केलेली लस इस्रायलमध्ये लसीकरणासाठी वापरली जात आहे. ही लस प्रभावी ठरली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE : ‘भारत माता की जय’ म्हणत पंतप्रधान मोदींनी फुंकले प.बंगालच्या निवडणुकीचे रणशिंग | National

2:19 pm (IST) राज ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत - नितेश राणे 'शिवसेनेच्या प्रकल्पाविरोधाचं कारण वेगळं' राजन साळवींचाही प्रकल्पाला पाठिंबा - नितेश...

pm modi rally in kolkata live updates: pm modi rally live update : PM मोदींची कोलकात्यात प्रचारसभा, भाषण सुरू… – pm modi rally in...

कोलकाताः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोलकात्यातील ब्रिगेड मैदानावर प्रचारसभा होत आहे. या सभेला हजारो नागरिक आले आहेत. पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं...

जातपंचायतीची बहिष्कारनीती सुरूच

म. टा. प्रतिनिधी, समाजमनावरील जातपंचायतीची दहशत उधळून लावल्याची घटना म्हसरूळ (ता. नाशिक) येथे ताजी असतानाच आता सिन्नरमध्ये जातपंचायतीने तरुणावर बहिष्कार घातल्याचा धक्कादायक प्रकार...

औरंगाबाद : विनयभंगप्रकरणी तीन आरोपी अटकेत

म. टा. प्रतिनिधी, कोचींग क्लासेसहून आपल्या घरी चाललेल्या एका करणाऱ्या तीन जणांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. ऋषीकेश पालोदकर (२२, रा. पुंडलिकनगर), शुभम...

Recent Comments