Home देश up government lifts ban on mobile use: यूपी सरकारने करोना वॉर्डातील मोबाइल...

up government lifts ban on mobile use: यूपी सरकारने करोना वॉर्डातील मोबाइल बंदी उठवली – up government lis ban on mobile use in covid 19 isolation ward by patients


लखनऊ: उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने कोविड रुग्णालयांतील आयसोलेशन वॉर्डमध्ये मोबाइल फोनच्या वापरावरील बंदीचा आदेश मागे घेतला आहे. यामुळे आता दाखल झालेले रुग्ण आयसोलेशन वॉर्डमध्ये मोबाइल वापरू शकणार आहेत.

तत्पूर्वी, मोबाइल फोनमुळे करोनाचा संसर्ग पसरत असल्याने आयसोलेशन वॉर्डमध्ये मोबाइल फोन नेता येणार नाही, असे म्हणत उत्तर प्रदेशच्या आरोग्य महासंचालक के. के. गुप्ता यांनी आयसोलेशन वॉर्डात मोबाईल वापरावर बंदी जाहीर केली होती. मात्र, आता योगी सरकारने हा आदेश मागे घेतला असून आता रुग्ण आयसोलेशन वॉर्डमध्ये मोबाइल वापरू शकणार आहेत.

या नव्या आदेशानुसार, रुग्णांना अटींसह खाजगी मोबाइल वापरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये जाण्यापूर्वी, रुग्णाला आपल्याकडे मोबाइल फोन आणि चार्जर असल्याचे सांगावे लागणार आहे. त्यानंतर आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल होण्यापूर्वी रुग्णालय व्यवस्थापनाद्वारे मोबाइल आणि चार्जरचे निर्जंतुकीकरण केले जाईल. त्याच वेळी, मोबाइल आणि चार्जर रुग्ण इतर कोणत्याही रुग्ण आणि आरोग्य कर्मचार्‍यांना देणार नाही. आयसोलेशन वॉर्डमधून बाहेर पडल्यानंतर रुग्णाचा मोबाइल आणि चार्जरचे पुन्हा निर्जंतुकीकरण केले जाईल.

खरे तर या पूर्वी यूपीचे वेद्यकीय महासंचालक के. के. गुप्ता यांनी मोबाइल घेऊन करोना रूग्णांना आयसोलेशन वॉर्डात दाखल करून घेण्यास बंदीचे आदेश दिले होते. यासाठी राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि संबंधित अधिकाऱ्यांना पत्रही लिहिले होते. महासंचालकांनी दिलेल्या आदेशानंतर राज्यातील कोविड -१९ला वाहिलेल्या रुग्णालयांमध्ये रूग्णांना मोबाइल वापरण्यास बंदी घालण्यात आली. मोबाइलमुळे करोना पसरतो असे महासंचालकांचे म्हणणे होते.

अखिलेश यादव यांनीही केली होती टीका

करोनाचा संसर्ग जर मोबाइलमधून पसरत असेल, तर संपूर्ण देशात आयसोलेशन वॉर्डद्वारे बंदी घालायला हवी, अशी टीका सपचे नेते अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारवर केली होती. मोबाइलमुळे मानसिक आधार मिळतो. वास्तविक, रुग्णालयांमधील गैरकारभाराची व दुर्दशेची सत्यता लोकांपर्यंत पोहोचू नये, म्हणून ही बंदी आहे, असा आरोप करताना गरज मोबाइलवर बंदी घालण्याची नसून स्वच्छता पूर्ण करण्याची आहे, असे यादव म्हणाले होते.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

India vs Australia: Brisbane Weather Day 5: पाचव्या दिवशी कसे असेल पिच आणि हवामान; कोण होणार विजेता, जाणून घ्या – aus Vs Ind 4th...

ब्रिस्बेन: aus vs ind 4th test Brisbane Weather भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे सुरू आहे....

आम्हाला कमी लेखू नका! हॉलिवूडवर वरचढ ठरायला आले बॉलिवूडचे 'सुपरहिरो'

मुंबई- मनोरंजनविश्वात काही आगामी बिग बजेट सिनेमांची चर्चा आतापासूनच रंगू लागली आहे. एरवी 'सुपरहिरो'चे चित्रपट म्हटल्यावर सर्वप्रथम हॉलिवूडपटांचीच चर्चा होते. पण, आता लवकरच...

अर्णब गोस्वामींची अडचण वाढणार; गृहमंत्री अनिल देशमुखांनी केले मोठे वक्तव्य – arnab goswami chat how arnab knows sensitive things like balakot and pulwama says...

नाशिक: रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) मुख्य संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या कथित व्हॉट्सअॅप चॅट (Whatsapp Chat) उघड झाल्यानंतर त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली...

Recent Comments