Home आपलं जग करियर UPSC ISS exam 2020: यूपीएससीच्या ISS परीक्षांसाठी नाेंदणीला सुरुवात - upsc iss...

UPSC ISS exam 2020: यूपीएससीच्या ISS परीक्षांसाठी नाेंदणीला सुरुवात – upsc iss exam 2020 registration started how to apply


UPSC ISS Exam 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) इंडियन स्टॅटेस्टिकल सर्व्हिस २०२० म्हणेजच भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेच्या नोंदणीला सुरूवात झाली आहे. यूपीएससीचे अधिकृत संकेतस्थळ upsconline.nic.in वर रजिस्ट्रेशनची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही नोंदणीची थेट लिंक या बातमीतही पुढे देण्यात आली आहे.

यूपीएससी स्टॅटेस्टिकल सर्व्हिस (UPSC Statistical Service) परीक्षा 2020 साठी १० जून २०२० पासून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या परीक्षेसाठी नोंदणी करण्याची अखेरची तारीख ३० जून २०२० आहे. ३० जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

रजिस्ट्रेशन प्रक्रिया दोन टप्प्यात पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात उमेदवारांना बेसिक माहिती भरून नोंदणी करायची आहे. दुसऱ्या टप्प्यात शुल्क भरणे, फोटो अपलोड करणे, स्वाक्षरी, फोटो आयडीसह अन्य कागदपत्रे अपलोड करणे, परीक्षा केंद्राची निवड करणे आदी प्रक्रीया पूर्ण कराव्या लागणार आहेत.

आयोगाने आयएसएससंबंधी जारी नोटिफिकेशनमध्ये म्हटलंय की ‘उमेदवारांनी हे ध्यानात ठेवावे की काही शहरांची परीक्षा केंद्रे वगळता अन्य ठिकाणी मर्यादित स्वरुपात परीक्षा केंद्रे निवडता येणार आहेत. ज्या शहरांमध्ये केंद्रांचे पर्याय मर्यादित आहेत ती शहरे अशी – दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, दिसपूर, कोलकाता. आधी अर्ज करणाऱ्यांना आधी केंद्रांचे वाटप होईल. म्हणूनच उमेदवारांनी आपल्या पसंतीच्या शहरात केंद्र मिळण्यासाठी आधी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.’

IES परीक्षा रद्द

यूपीएससीने असंही जाहीर केलं आहे की यंदा इंडियन इकॉनॉमिक्स सर्व्हिस परीक्षा २०२० (UPSC IES 2020) रद्द करण्यात आली आहे. कारण यावर्षी अर्थ मंत्रालयाकडून एकाही रिक्त जागेची माहिती देण्यात आलेली नाही.

UPSC ISS Exam 2020 Registration पार्ट-१ साठी येथे क्लिक करा.

UPSC ISS Exam 2020 Registration पार्ट-२ साठी येथे क्लिक करा.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Farmers agitation: जिल्हाधिकारी कार्यालयात उधळला भाजीपाला – aurangabad farmers agitation for announce wet drought and compensation

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादसातत्याने होत असलेली अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील खरीप हंगामातील उभे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसान भरपाई तातडीने द्यावी; तसेच जिल्ह्यात ओला...

tejashwi yadav public rally: तेजस्वी यादव यांच्यावर चप्पल भिरकावली, एक चुकली तर दुसरी फेकली – bihar election a pair of slippers hurled at rjd...

औरंगाबाद: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी ( bihar election ) राजकीय पक्ष आणि त्यांचे दिग्गज नेते अनेक शहरांमध्ये रॅली आणि जाहीर प्रचारसभा घेत आहेत. याच...

mask price in Maharashtra: Mask Price: एन-९५ मास्क फक्त १९ रुपयांपासून!; राज्यात असे असतील मास्कचे दर – maharashtra govt caps prices of n 95...

मुंबई:करोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावा, यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्र...

Recent Comments