Home आपलं जग करियर upsc pre ecam 2020: UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा उमेदवारांना परीक्षा केंद्र...

upsc pre ecam 2020: UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलता येणार – upsc pre ecam 2020 upsc allows civil services prelim candidates to change exam centres


UPSC Exam 2020: यूनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच यूपीएससीने उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. ४ ऑक्टोबर २०२० रोजी होणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षएसाठी उमेदवारांना आता परीक्षा केंद्र बदलता येणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी नागरी वन सेवा पूर्व परीक्षेसह अन्य सेवांसाठी परीक्षा होत आहे.

उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर परीक्षा केंद्र बदलण्याची मागणी केली होती. ती लक्षात घेऊन उमेदवारांनी परीक्षा केंद्र बदलण्याची संधी देण्यात येत आहे, असे आयोगाने बुधवारी जारी केलेल्या जाहीर निवेदनात म्हटले आहे. याव्यतिरिक्त केंद्रीय नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२० आणि भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा २०२० या परीक्षांसाठीदेखील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलता येणार आहे, असं निवेदनात म्हटलं आहे.

दोन टप्प्यांमध्ये उमेदवारांना परीक्षा केंद्र बदलण्याची प्रक्रिया करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात ७ जुलै ते १३ जुलै २०२० (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) आणि दुसऱ्या टप्प्यात २० ते २४ जुलै २०२० (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन हा परीक्षा केंद्राचा पर्याय बदलता येणार आहे.

एनसीईआरटीत नोकरभरती; २६६ जागा रिक्त

उमेदवारांनी हेही लक्षात घ्यावं की एकदा परीक्षा केंद्राचा पर्याय बदलला की तो पर्याय गोठवण्यात येणार आहे (लॉक होणार आहे). उमेदवारांना एकदा बदललेलं परीक्षा केंद्र पुन्हा बदलता येणार नाही. ही नागरी सेवा पूर्व परीक्षा आधी ३१ मे रोजी होणार होती, पण करोना महामारी संकटामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आता ४ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे.

इंटेलिजन्स ब्युरोत अनेक पदांवर भरती…

‘विथड्रॉवल विंडो’

यूपीएससीने उमेदवारांना एक ‘विथड्रॉवल विंडो’ सुद्धा उघडून दिली जाणार आहे. यानुसार, १ ते ८ ऑगस्ट २०२० या कालावधीत उमेदवारांना त्यांचे अर्ज मागे घेण्याची मुभा देखील दिली जाणार आहे. एकदा अर्ज मागे घेतला की मात्र तो पुन्हा दाखल होऊ शकणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असंही या निवेदनात म्हटलं आहे.

यूपीएससीच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

परीक्षा केंद्र बदलण्याविषयीची नोटीस वाचण्यासाठी येथे क्लिक करा.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ncb arrest two drug peddler: NCB च्या जाळ्यात ‘हाय प्रोफाईल’ दलाल, सलग तिसऱ्या दिवशी कारवाई – ncb arrest two drug peddler in south mumbai

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: नारकॉटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) अमली पदार्थविरोधी मोहिमेचा धडाका कायम ठेवला आहे. सलग तिसऱ्या दिवशी दोन दलालांना जेजे इस्पितळ परिसरातून...

Shahrukh Khan And Other Bollywood Celebrities Reaction On Indian Team Win Against Australia – शाहरुख खानने पहाटे उठून पाहिला पाचव्या दिवसाचा सामना, म्हणाला ‘आता...

मुंबई- भारतीय संघाने मंगळवारी ब्रिस्बेनच्या गाबा येथे चौथा कसोटी सामना ३ गडी राखून जिंकत इतिहास रचला. यानंतर सोशल मीडियावर खेळाडूंवर अभिनंदनाचा पाऊस पडत...

Recent Comments