Home देश पैसा पैसा Urjit Patel set for comeback: माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांचा कमबॅक ;...

Urjit Patel set for comeback: माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांचा कमबॅक ; नव्या जबाबदारीसाठी सज्ज – ex governor urjit patel set for comeback with new role


मुंबई : डॉ. पटेल येत्या २२ जून रोजी NIPFP च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. ही नियुक्ती चार वर्षासाठी असेल. तत्पूर्वी डॉ. पटेल यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम पाहिलं होतं. पटेल यांच्या गव्हर्नरपदाच्या काळात केंद्र सरकारचा रिझर्व्ह बँकेत अवाजवी हस्तक्षेप वाढला होता. यामुळे बँकेची स्वायत्तता धोक्यात आली होती. त्यामुळं पटेल यांनी वैयक्तिक कारण देत कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच डिसेंबर २०१८ मध्ये राजीनामा दिला होता.

विशेष म्हणजे त्याआधीचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पटेल यांची केंद्रातील भाजप सरकारने नवे गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली होती. मात्र त्यानंतर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक बोर्ड यांच्यात खटके उडु लागले. पटेल यांचे सहकारी डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी सरकारवर जाहीर टीका केली होती. रिझर्व्ह बँकेची स्वायत्ता धोक्यात आल्याचा दावा आचार्य यांनी करत राजीनामा दिला होता.

आत्मनिर्भर भारत; आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची घुसखोरी!
बुडीत कर्जाच्या मुद्द्यावर रिझर्व्ह बँकेने सार्वजनिक क्षेत्रातील ११ बँकांवर निर्बंध लादल्यानंतर केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यातील संबंध ताणले गेले. पटेल यांनी अनेकदा यावर जाहीर भाष्य करणे टाळले. मात्र काम करणे अवघड झाल्याने अखेर त्यांनी तब्बेतीचे कारण पुढे करत पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर २०१८ मध्ये पटेल यांनी राजीनामा दिला. त्यांचा नऊ महिन्यांचा कालावधी शिल्लक होता. पटेल यांच्या जागी सरकारने थेट अर्थ मंत्रालयातून शक्तिकांत दास यांच्याकडे बँकेची जबाबदारी सोपवली. दास यांनी मागील वर्षभरात केंद्र सरकार आणि बँकेतील संबंध पूर्ववत करण्यास प्रयत्न करुन निवड सार्थ ठरवली.
लग १४ दिवस दरवाढ ; पेट्रोल -डिझेल १० टक्क्यांनी महागले
केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय पटेल यांची नव्या ठिकाणी नियुक्ती होणे अशक्य आहे. त्यामुळे पटेल आणि केंद्र सरकारमध्ये आता पॅचअप झाल्याचे म्हणता येईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी (NIPFP) या संस्थेवर मुख्यत्वेकरून अर्थ खात्याचे नियंत्रण आहे. त्यामुळे अर्थ खात्यासोबत पटेल यांना काम करावं लागणार आहे.

वाचा : India-China: भारत फास आवळणार; मोदी सरकार चीनचं नाक दाबून तोंड उघडणार
वाचा : भारतीयांना ठरवले तर चीनला बसू शकतो १७ अब्ज डॉलरचा झटका!Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

it raid: anurag kashyap : अनुराग कश्यप, तापसी पन्नूसह इतरांनी कोट्यवधींची संपत्ती दडवली! – it raid on two production houses anurag kashyap and taapsee...

नवी दिल्लीः दिग्दर्शक अनुराग कश्यप ( anurag kashyap ), अभिनेत्री तापसी पन्नू ( taapsee pannu ) आणि इतर काही जणांच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाने...

Recent Comments