Home विदेश us ban chinese company: भारतानंतर अमेरिकेचाही चीनला दणका; टेलिकॉम क्षेत्रातील 'या' कंपन्यांवर...

us ban chinese company: भारतानंतर अमेरिकेचाही चीनला दणका; टेलिकॉम क्षेत्रातील ‘या’ कंपन्यांवर बंदी – us fcc puts huawei zte out of business in country


वॉशिंग्टन: आक्रमक विस्तारवादी भूमिका घेणाऱ्या चीनला भारतापाठोपाठ अमेरिकेने झटका दिला आहे. भारताने चीन कंपन्यांच्या ५९ अॅप्सवर बंदी आणल्यानंतर अमेरिकेनेही चीनच्या दोन मोठ्या कंपन्यांना देशाच्या सुरक्षितेसाठी धोका असल्याचे सांगितले आहे. हुवैई टेक्नोलॉजी आणि झेडटीई कॉर्प या कंपन्यांना अमेरिकेने व्यवसाय करण्यास मनाई केली आहे.

अमेरिकेच्या फेडरल कम्युनिकेश कमिशनने मंगळवारी ५-० या मताच्या आधारे या कंपन्यांना देशासाठी धोकादायक असल्याचे सांगितले आहे. अमेरिकन सरकारने या कंपन्यांसोबत करारदेखील केला होता. या करारानुसार, ८.४ अब्ज डॉलर किंमतीच्या वस्तू, उपकरणे खरेदी करण्यात येणार होते. मात्र, यासाठीचा निधी थांबवण्यात आला आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर दोन्ही कंपन्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. अमेरिका फेडरल कम्युनिकेशन कमिशनने म्हटले की, टेलिकॉम कंपन्यांना आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरमधून या दोन्ही कंपन्याच्या उपकरणांना हटवावे लागणार आहे. अमेरिकेच्या सुरक्षितेसोबत कोणतीही जोखीम घेणार नसल्याचेही कमिशनने म्हटले आहे.

वाचा: चीनची आता आर्थिक युद्धाची भारताला धमकी; अॅप बंदी झोंबली

वाचा: भारताला अद्यावत लढाऊ विमाने; अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक सादर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील वर्षी एक आदेश काढला होता. या आदेशानुसार, ज्या कंपन्यांमुळे देशाच्या सुरक्षितेला धोका निर्माण होईल, अशा कंपन्यांसोबत कोणत्याही प्रकारचा टेलिकम्युनिकेशन व्यवसाय करण्यात येणार नसल्याचे अमेरिकेने म्हटले होते. अमेरिकेचा हुवैईसोबत आधीपासून वाद सुरू होता. या कंपनीला अमेरिकेने काळ्या यादीतही टाकले होते.

वाचा: केंद्र सरकारची चिनी अॅप्सवर बंदी; चीनचा थयथयाट सुरू ! 76723686
दरम्यान, भारताने सोमवारी ५९ चिनी अॅपवर बंदी घालत चीनला झटका दिला आहे. यावर चीन खवळला आहे. चीनच्या सरकारी मीडियाने भारताला धमकावण्यास सुरुवात केली असून भारताविरोधात आर्थिक युद्ध पुकारण्याचा इशारा दिला. भारताने बंदी घातलेल्या अॅप्सविरोधात अनेक तक्रारी येत होत्या. हे अॅप्स देशाचे सार्वभौमत्व, सुरक्ष आणि अखंडतेसाठी घातक बनत चालले होते. चीन या अॅप्सद्वारे भारतीयांच्या डेटाशी छेडछाड करू शकत होता, त्यामुळे केंद्र सरकारने या अॅप्सवर बंदी घातली आहे. त्यानंतर चीनमधील माध्यमांमध्ये या निर्णयाचे पडसाद उमटले. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने म्हटले की, भारताने घेतलेला हा निर्णय म्हणजे अमेरिकेच्याजवळ जाण्याचा प्रयत्न असल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. अमेरिकेनेदेखील राष्ट्रवादाच्या आडून चिनी वस्तूंवर बंदी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या निर्णयामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याचे ग्लोबल टाइम्सने म्हटले.

तर, चीनविरोधात मोठा निर्णय घेत भारताने लोकप्रिय टिकटॉकसह चीनच्या ५९ अॅप्सवर बंदीचा (Chinese apps banned in india) निर्णय घेतला. पण चीनही यात मागे नाही. चीनमध्ये भारतीय ई-पेपर आणि न्यूज वेबसाइट बंद करण्यात आल्या आहेत. अनेक युझर्स भारतातील बातम्या वाचू शकत नाहीत. तर अनेकांना फक्त व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजेच व्हीपीएनसह वेबसाइट वाचता येत आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

farmers protest: tractor rally : दिल्लीत हिंसक आंदोलन; केंद्राकडून गंभीर दखल, सिंघू सीमेवरून शेतकरी नेते ‘गायब’ – tractor rally violence in farmers protest signs...

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात ( farmers protest ) शेतकरी ट्रॅक्टर परेडमध्ये ( tractor rally ) मंगळवारी हिंसाचार झाला. शेतकरी आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड...

R. Ashwin: टीम इंडियामध्ये लागलं मोठं चॅलेंज, पुजाराने ‘ही’ गोष्ट केल्यावर अश्विन अर्धी मिशी ठेवणार – ind vs eng : indian cricketer r. ashwin...

नवी दिल्ली, IND vs ENG : भारतीय संघामध्ये सध्याच्या घडीला एक मोठं चॅलेंज लागलेलं आहे. हे चॅलेंज भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भरवश्याचा फलंदाज...

Recent Comments