Home विदेश us election and coronavirus: Coronavirus अमेरिका: ​निवडणुकीपूर्वीच मोठे संकट; करोनाबाधितांची संख्या वाढली​...

us election and coronavirus: Coronavirus अमेरिका: ​निवडणुकीपूर्वीच मोठे संकट; करोनाबाधितांची संख्या वाढली​ – us eletion corona virus infection cases increased in several states before elections


वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १५ दिवस उरले आहेत. अमेरिकेत एका बाजूला प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे निवडणुकीचा निकाल ठरवणाऱ्या महत्त्वाच्या राज्यात बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे निवडणूक अधिकारी आणि मतदारांची काळजी वाढली आहे.

अमेरिकेत करोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. करोनाच्या थैमानात निवडणूक पार पडत असून पोस्टल मतदानाचा पर्याय मतदारांना उपलब्ध करून दिला आहे. आयोवा, विस्कॉन्सिनशिवाय मिशिगन, मिनेसोट, पेन्सिल्वेनिया, ओहायो या राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग वाढला आहे. करोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विस्कॉन्सिन राज्यात मोठ्या प्रमाणावर करोनाबाधित आढळले. राज्यपाल टोनी इवांस यांनी सांगितले की, मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे विस्कॉन्सिन नॅशनल गार्डस् तैनात करण्यात आले आहेत. निवडणूक कर्मचाऱ्यांची काळजी घेत काही राज्यांमध्ये प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. काही राज्यांनी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले आहेत. आयोवा आणि विस्कॉन्सिन सारख्या राज्यात निवडणूक अधिकारी मतदान केंद्र वेळे आधीच सुरू करत आहेत. त्याशिवाय मतदारांनाही लांब रांगांमध्ये उभे राहण्याच्या तयारीत येण्यास सांगितले जात आहे.

वाचा: गुड न्यूज! भारतात दाखल होणार ‘ही’ लस; चाचणी करण्यास मान्यता

आयोवामध्ये स्कॉट काउंटी ऑडिटर रोक्सना मोरित्ज यांनी डेव्हनपोर्ट आणि जवळच्या परिसरात मतदानाच्या दिवशी अतिरिक्त मतदान केंद्र सुरू केले आहेत. मतदान केंद्रावर लोकांची गर्दी टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

वाचा: करोना: मस्तच! लस मंजुरीसाठी ‘ही’ कंपनी नोव्हेंबरमध्ये करणार अर्ज

वाचा: काय म्हणे तर, ऑक्सफर्डची करोना लस घ्याल तर माकड व्हाल!

अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या ८२ लाखांवर पोहचली आहे. तर, दोन लाथ २३ हजारजणांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. तर, ५३ लाख बाधितांनी आजारावर मात केली आहे. अमेरिकेच्या निवडणुकीत करोनाचा मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाच्या मुद्यावरून अडचणीत आणण्याचा प्रयत्न डेमोक्रॅटीक पक्षाकडून करण्यात येत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune: Pune: तरुणी दुचाकीवरून चालली होती, भर रस्त्यात तिला अडवले अन् – pune 25 year old woman beaten on handewadi road

म. टा. प्रतिनिधी, पुणे: हांडेवाडी रस्त्यावर तरुणीला भर रस्त्यात आडवून तिचे डोके दुचाकीच्या हँडलवर आदळून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे....

oxygen tank: ऑक्सिजन टँकवर सीसीटीव्हीची नजर – nashik municipality administration set up cctv in bitco and zakir hussain hospital for security of oxygen

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकशहरातील करोना नियंत्रणात येत असला तरी संभाव्य दुसऱ्या लाटेसाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. बिटको आणि डॉ. झाकीर हुसैन...

Recent Comments