Home विदेश US on Tibet Issue: चीनला डिवचले: तिबेट निर्वासित सरकारच्या अध्यक्षांची 'व्हाइट हाउस'ला...

US on Tibet Issue: चीनला डिवचले: तिबेट निर्वासित सरकारच्या अध्यक्षांची ‘व्हाइट हाउस’ला भेट – exiled tibetan leader visits us white house after 6 decades


वॉशिंग्टन: तिबेटच्या निर्वासित सरकारचे अध्यक्ष डॉ. लोबसांग सांगेय यांनी शुक्रवारी अमेरिकेच्या व्हाइट हाउसला औपचारिक भेट दिली. गेल्या साठ वर्षांत पहिल्यांदाच तिबेटच्या निर्वासित सरकारच्या प्रमुखांनी व्हाइट हाउसला भेट दिली. ‘सेंट्रल तिबेटियन अॅडमिनिस्ट्रेशन’साठी (सीटीए) हे ऐतिहासिक पाउल ठरले आहे. अमेरिकेने काही दिवसांपूर्वीच तिबेटच्या स्वायत्तेबाबत एक ठराव मंजूर केला होता. त्यानंतर ही भेट म्हणजे चीनच्या आक्रमक विस्तारवादी भूमिकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

वॉशिंग्टनमधील तिबेट कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाने निमंत्रण दिलेले डॉ. सांगेय हे तिबेटी निर्वासित सरकारचे पहिले अध्यक्ष ठरले आहेत. अमेरिकेचे सहायक मंत्री आणि तिबेटबद्दलच्या मुद्द्यांचे विशेष समन्वयक रॉबर्ट देस्त्रो यांची त्यांनी भेट घेतली.

वाचा: ट्रम्प यांची सत्ता हस्तांतराची तयारी, मात्र पराभव अमान्य!

अमेरिकी सरकारने तिबेटच्या निर्वासित सरकारला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे गेल्या सहा दशकांमध्ये या सरकारच्या प्रतिनिधींना अमेरिकी परराष्ट्र खाते, तसेच व्हाइट हाउसकडून निमंत्रण देण्यात आले नव्हते. मात्र, शुक्रवारी झालेल्या या भेटीमुळे अमेरिकेने ‘सीटीए’ची लोकशाही व्यवस्था आणि त्याच्या प्रमुखांना मान्यता देण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाने गेल्या महिन्यात डॉ. सांगेय यांना आमंत्रण दिले होते.

वाचा: ‘चीनकडून अमेरिकेची महासत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न’

डॉ. सांगेय यांनी व्हाइट हाउसच्या अधिकाऱ्यांची औपचारिकपणे भेट घेतल्याचे ‘सीटीए’ सांगितले आहे. मात्र, यापूर्वी डॉ. सांगेय यांनी अमेरिकी अधिकाऱ्यांची गेल्या दहा वर्षांत अज्ञात ठिकाणी अनेकदा भेट घेतली आहे. डॉ. सांगेय २०११पासून तिबेटच्या निर्वासित सरकारचे सिकयोंग (अध्यक्ष) आहेत. ‘डॉ. सांगेय यांचा सेंट्रल तिबेटियन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला आहे. तिबेट धोरण आणि पाठिंबा कायदा, २०१९साठी त्यांनी अविश्रांतपणे पाठपुरावा केला,’ असेही ‘सीटीए’ने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

वाचा: जगाची फॅक्टरी थंडावणार; चीनच्या आर्थिक धोरणात होणार ‘हे’ बदल

अमेरिकी काँग्रेसच्या चीनबद्दलच्या आयोगाचे अध्यक्ष जिम मॅकगोवर्न, तसेच सिनेटच्या पररराष्ट्र व्यवहार समितीच्या अधिकाऱ्यांशी यांच्यासोबत डॉ. सांगेय यांनी या आठवड्याच्या सुरुवातील व्हर्च्युअल बैठकांच्या माध्यमातून चर्चा केली होती. यामध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक अशा दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. प्रतिनिधी नगोदुप त्सेरिंग आणि केलसंग दोलमा यांचाही या चर्चेत सहभाग होता.

वाचा: चीनची थेट भूतानमध्ये घुसखोरी; एक गावच वसवले!

ऑक्टोबरमध्ये डॉ. सांगेय यांना अमेरिकी परराष्ट्र खात्याने निमंत्रण दिले होते. त्याला चीनने विरोध केला होता. अमेरिकेने आमच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये हस्तक्षेप करणे थांबवावे, असे चीनने म्हटले होते. तिबेटच्या स्वातंत्र्याला पाठिंबा न देणे, तसेच तिबेटच्या निर्वासित सरकारला मान्यता न देण्याच्या अमेरिकेच्या धोरणात्मक भूमिकेचे रॉबर्ट देस्त्रो यांनी उल्लंघन केले आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

adult woman free to live with anyone anywhere: ‘प्रौढ तरुणी आपल्या मर्जीने कुठेही आणि कोणाबरोबरही राहण्यास स्वतंत्र’ – adult woman free to live with...

नवी दिल्लीः दिल्ली उच्च न्यायालयाने ( delhi high court ) बुधवारी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. प्रौढ महिला आपल्या मर्जीने कोणाबरोबरही आणि कुठेही राहण्यास...

‘त्या’ प्रसूतीबाबत पोलिसांनी मागविली कागदपत्रे

म. टा. खास प्रतिनिधी, अल्पवयीन मुलगी प्रसूतीसाठी दाखल होऊनही याबाबत पोलिसांना न कळविल्याने सिव्हिल हॉस्पिटल प्रशासन अडचणीत आले आहे. या मुलीवर सामूहिक...

aurangabad News : अन्नातून करोना संसर्ग? ठोस पुराव्यांचा अभाव – corona infection from food; lack of concrete evidence

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: करोनाचा संसर्ग अन्नातून किंवा खाद्य पदार्थातून होण्याविषयी आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही. गरम पाणी पिणे किंवा बाहेरून...

Recent Comments