Home विदेश US Senate Passes Bill To Punish China Over Hong Kong - USA...

US Senate Passes Bill To Punish China Over Hong Kong – USA China चीनला अद्दल घडवा! अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर


वॉशिंग्टन: व्यापार करार आणि करोना संसर्गाच्या मुद्यावरून चीन आणि अमेरिकेत वाढलेल्या तणावात आता आणखी भर पडणार आहे. चीनला आणि चीनच्या बाजूने उभे राहण्यांवर निर्बंध घालण्याचे विधेयक अमेरिकन सिनेटमध्ये मंजूर करण्यात आले आहे. हाँगकाँगच्या स्वायत्त अधिकारांना चीनने पायदळी तुडवले असल्याचा आरोप अमेरिकन सिनेटमध्ये करण्यात आला आहे.

अमेरिकन सिनेटमध्ये ‘हाँगकाँग स्वायत्ता विधेयक’ मांडण्यात आले होते. या विधेयकानुसार, हाँगकाँगच्या स्वायत्तेला विरोध करणाऱ्या आणि चीनला पाठिंबा देणाऱ्या बँकांनाही निर्बंध घालण्याचा प्रस्ताव आहे. त्याशिवाय अशा बँकांना अमेरिकेपासून वेगळ पाडण्याचा आणि अमेरिकन डॉलरमधील व्यवहारात निर्बंध घालण्याचा प्रस्ताव आहे.

वाचा: चीनचा भारताला धोका; युरोपमधील अमेरिकेच्या फौजा आशियाकडे रवानाः पॉम्पिओ

सिनेटमध्ये हाँगकाँग स्वायत्ता विधेयक सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले. आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी हाऊस ऑफ रिप्रेझेंटीव्हमध्ये मंजूर करावे लागणार आहे. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी होईल. डेमोक्रेटीक पक्षाचे सिनेटर, क्रिस वॅन होलेन यांनी सांगितले की, या विधेयकातून चीनला गंभीर इशारा देण्यात आला आहे. हाँगकाँगच्या स्वायत्तेवर घाला घातल्यास त्याचे गंभीर परिणाम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रस्तावाचे समर्थन करणारे सिनेटर जोश हावली यांनी सांगितले की, हाँगकाँगला उद्धवस्त करणाऱ्या चीनच्या प्रयत्नांना रोखण्याचा हा आमचा शेवटचा प्रयत्न असू शकतो. हे विधेयक मागील आठवड्यातच मंजूर झाले असते. मात्र, रिपब्लिकन सिनेटर केविन क्रेमर यांच्यामुळे हे विधेयक मांडण्यास उशीर झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

वाचा: अमेरिकेचा चीनला झटका; ट्रम्प यांनी ‘या’ विधेयकावर केली स्वाक्षरी

वाचा: ट्रम्प यांनी चीनला डिवचले; करोनाला दिले ‘हे’ नाव!

अमेरिका आणि चीनमध्ये वाढत्या तणावात या विधेयकामुळे भर पडणार असल्याची चर्चा आहे. करोनाच्या संसर्गानंतर अमेरिकेने चीनविरोधात मोहीम सुरू केली आहे. त्याशिवाय दक्षिण चीन समुद्रातही तैवानच्या मदतीला अमेरिका उभी राहिली आहे. त्याचे पडसादही दोन्ही देशांच्या संबंधांवर उमटले आहेत. काही दिवस आधीच चीनच्या अडचणी वाढवणाऱ्या विधेयकावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. चीनमध्ये उइगर मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्यांकाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेविरोधातील हे विधेयक आहे.

या विधेयकानुसार, चीनमधील उइगर मुस्लिम व अन्य अल्पसंख्याविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत सहभाग घेणाऱ्यांविरोधात अमेरिका कारवाई करणार आहे. पश्चिम शिनजियांग भागामध्ये उइगर आणि अन्य अल्पसंख्याक नागरिकांवर देखरेख ठेवणाऱ्या आणि त्यांना ताब्यात घेणाऱ्या चीनच्या अधिकाऱ्यांना अमेरिकेत प्रतिबंध घालण्यात येणार आहे. चीनमध्ये जवळपास एक लाख अल्पसंख्याक नागरिकांना शिबीरात ठेवण्यात आले आहे. या छळाविरोधात चीनविरोधात पाऊल उचलणारा अमेरिका हा पहिला देश ठरला आहे. उइगर मुस्लिम हे चीनसाठी धोका असल्याची भूमिका चीनने मांडली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jaan kumar sanu controversial statement: आता मराठी माणसं तुला थोबडवनार; जान कुमार सानूला मनसेचा इशारा – bigg boss 14 contestant jaan kumar sanu controversial...

मुंबई: भांडणं, वाद असं समीकरणच असलेल्या बिग बॉस या रियालिटी शोमध्ये स्पर्धकाकडून मराठी भाषेचा अवमान केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. प्रसिद्ध गाय...

aurangabad murder case: पार्टी केल्यानंतर हाणामारी झाली, मित्रानेच केला मॉन्टी सिंहचा खून – Aurangabad News Monty Singh Was Killed By Friend

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: पार्टी केल्यानंतर रात्री दोनच्या सुमारास झालेल्या वादानंतर आपसात हाणामारी झाली. यानंतर मॉन्टी सिंह बिहारी उर्फ मंटूश कुमार सिंह याचा...

Mehbooba Mufti Slams BJP After Nia Raids in Jammu And Kashmir – NIA भाजपची पाळीव बनली आहे; मेहबूबा मुफ्तींनी साधला निशाणा

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufi) यांनी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) टाकलेल्या छाप्यांनंतर भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे....

Recent Comments