Home विदेश USA China चीनची चहुबाजूने कोंडी!; अमेरिका, ब्रिटनसह २७ देश एकवटले - USA...

USA China चीनची चहुबाजूने कोंडी!; अमेरिका, ब्रिटनसह २७ देश एकवटले – USA Britain Against China In Unhrc On Hongkong Human Rights Issue


वॉशिंग्टन: चीनच्या आक्रमक विस्तारवादी भूमिकेमुळे आता जगभरात रोष निर्माण होत आहे. त्याचवेळी चीनमधील मानवाधिकार हक्कांचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. हाँगकाँग सुरक्षा विधेयकाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने चीनला आंतरराष्ट्रीय पातळीवर घेरण्यासाठी अमेरिका, ब्रिटनसह २७ देश एकवटले आहेत. त्यामुळे आता चीन आणि अमेरिकेमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिका चीनमध्ये सुरू असलेल्या मानवाधिकाराच्या गळचेपीचा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार आयोगात उपस्थित करणार आहे. मानवाधिकार आयोगात अमेरिका, ब्रिटनच्या आवाहनावर या मुद्यावर अनौपचारिक चर्चादेखील झाली आहे. ऑस्ट्रेलिया, जपानसह आशियान गटातील महत्त्वाच्या देशांची अमेरिकेला साथ मिळणार आहे. त्याशिवाय युरोपमधील अनेक देश चीनविरोधात भूमिका घेणार असल्याचे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलियाने इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अमेरिका-चीनच्या वाढत्या तणावाला लक्षात घेऊन लष्करावरील खर्च वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन लष्कर, नौदलाच्या ताफ्यात अत्याधुनिक शस्त्रांचा समावेश करण्यात येणार आहे.

वाचा: भारताविरोधात दोन आघाड्यांवर युद्धाचा चीन-पाकिस्तानचा कट?
वाचा: फ्रान्समधून भारतात ‘असा’ दाखल होणार राफेलचा ताफा!

भारतासोबत चीनचा वाद सुरूच असून चीनचा जपानसोबत सेनकाकू बेटाच्या मुद्यावर तणाव वाढला आहे. तर, दक्षिण चीन समुद्रावर वर्चस्व गाजवण्यासाठी चीनची धडपड सुरू असल्यामुळे अन्य देशांसोबतच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. चीनने तैवानला धमकी दिल्यानंतर अमेरिकन नौदलाची युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात दाखल झाली आहे.

वाचा: चीनच्या दादागिरीविरोधात आता ‘या’ देशानेही दंड थोपटले!
वाचा: ट्रम्प म्हणाले, चीनवर मला राग येतोय….!

हाँगकाँग सुरक्षा कायदा लागू

दरम्यान, हाँगकाँगमधील विध्वंसक आणि विभाजनवादी शक्तींना मोडून काढण्याचे कारण देत चीनने हाँगकाँग राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर केला आहे. यामुळे हाँगकाँगमधील विरोधी आवाज दाबून टाकला जाण्याचे भय निर्माण झाले आहे. चिनी राष्ट्रीय पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीतील हाँगकाँगचे एकमेव प्रतिनिधी ताम यिउ चुंग यांनी मंगळवारी हा कायदा मंजूर झाल्याचे वार्ताहरांना मुलाखतीद्वारे सांगितले. या कायद्यात मृत्युदंडाची शिक्षा समाविष्ट नसली तरी त्यांनी हा कायदा पूर्वलक्ष्यी प्रभावाने राबवला जाईल किंवा कसे, याबाबत त्यांनी काहीही स्पष्ट केले नाही. या कायद्यामुळे लोकांना अडचणीत आणणाऱ्या कृतींपासून रोखता येईल, असे ताम म्हणाले. देशाचे विभाजन करण्यासाठी हाँगकाँग अस्त्र म्हणून वापरू दिले जाणार नाही, असेही ते म्हणाले.

वाचा: चीनच्या बॉम्बरला जपानच्या हवाई दलाने पिटाळून लावले



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Devendra Fadnavis writes to CM Thackeray: Metro Carshed: मेट्रो कारशेड प्रश्नी फडणवीसांनी केले उद्धव ठाकरेंना सावध – opposition leader devendra fadnavis has written letter...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमेट्रो-३च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट आधीच घालण्यात आला असून, त्यासाठी अहवाल तयार करून नवीन समितीचा निव्वळ फार्स करण्यात येत...

Digilocker Service at Central Railway Station: रेल्वे प्रवाशांसाठी मध्य रेल्वे सुरू करणार ‘डिजीलॉकर’ – central railway has decided to start digilocker service in csmt...

म. टा. प्रतिनिधी, मुंबईछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर रेल्वे स्थानकात डिजीलॉकर सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. 'प्रथम...

Recent Comments