Home विदेश usa china tension: चीनची दादागिरी: अमेरिकेने दंड थोपटले, विमानवाहू युद्धनौका तैनात! -...

usa china tension: चीनची दादागिरी: अमेरिकेने दंड थोपटले, विमानवाहू युद्धनौका तैनात! – south china sea dispute: us deploys three aircraft carriers


दक्षिण चीन समुद्रात चीन आपले वर्चस्व वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सामरीकदृष्ट्या दक्षिण चीन समुद्राचे मोठे महत्त्व आहे. चीनने आणि शेजारील देशांमध्ये यावरून वाद सुरू आहेत. या भागात चीनची दादागिरी वाढत असून अमेरिकेनेही याविरोधात दंड थोपटले आहेत. चीनच्या नौदलाकडून युद्ध सराव असल्यामुळे तैवानसह इतर देशांनीही काळजी व्यक्त केली होती. आता तैवानचा मित्र देश असलेल्या अमेरिकेने आपल्या तीन मोठ्या विमानवाहू युद्धनौका पाठवल्या आहेत. या तिन्ही विमानवाहू युद्ध नौका हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागरात तैनात करण्यात आल्या आहेत. वेळ पडल्यास या युद्धनौका चीनच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत. जवळपास तीन वर्षात पहिल्यांदाच अमेरिकेच्या या तिन्ही विमानवाहू युद्धनौका या भागात गस्त घालत आहेत. त्याशिवाय अमेरिकेचे ड्रोन, क्रूझर, लढाऊ विमानेदेखील गस्त घालत आहेत.

अमेरिकन नौदलाचे शक्ति प्रदर्शन

चीन आणि अमेरिकेत मागील काही महिन्यांपासून तणाव वाढत आहे. अशा तणावाच्या परिस्थितीत अमेरिकेने हिंदी महासागर आणि पॅसिफिक महासागर क्षेत्रात अमेरिकन नौदलाने शक्ती प्रदर्शन केले असल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे. त्याशिवाय करोनाच्या संसर्गातूनही नौदल मुक्त झाली असल्याचा हा संकेत दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नौदलाच्या क्रूझर, संहारक नौका, लढाऊ विमानांसह विमानवाहू युद्धनौका दिसून आल्यामुळे ही सामान्य घटना नसल्याचा दावा त्यांनी केला.

चीनला अमेरिकेने दिला संदेश

maharashtra times

चीनने मंजूर केलेले हाँगकाँग सुरक्षा विधेयक आणि दक्षिण चीन समुद्रात चीन करत असलेल्या दादागिरीला अमेरिकेने विरोध दर्शवला आहे. सेंटर फॉर स्ट्रेटेजिक अॅण्ड इंटरनॅशनल स्टडीज मध्ये चीन पॉवर प्रोजेक्टचे संचालक बोनी ग्लेजर यांनी सांगितले की, अमेरिका करोनाच्या संसर्गात अडकली असून त्यांचे सैन्य तयार नसल्याचे संकेत चीनमध्ये प्रकाशित झालेल्या लेखांद्वारे मिळाले. त्यामुळेच चीनला इशारा देण्यासाठी अमेरिकेने एवढ्या मोठ्या प्रमाणावर जमवाजमव केली असून आम्ही युद्धासाठी तयार असल्याचा सूचक संदेश चीनला दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

तीन विमानवाहू युद्धनौका एकत्र दिसणे असामान्य घटना

maharashtra times

या भागात तीन विमानवाहू युद्धनौका दिसणे ही असामान्य घटना असल्याचे समजले जाते. या विमानवाहू युद्धनौकांची संख्या मर्यादित आहे. त्याशिवाय, या युद्धनौका दुरुस्ती, बंदरांचे निरीक्षण, प्रशिक्षण आदी कामांमध्ये अथवा दुसऱ्या देशांमध्ये तैनात असतात. अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण रणनितीमध्ये चीनपासून देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगितले होते. अमेरिकेचे संरक्षण मंत्रालय पेंटागनकडून सैन्यासाठी आणखी मदत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

दक्षिण चीन समुद्रात चीन उभारत आहे सैनिक तळ

maharashtra times

दक्षिण चीन समुद्रावर वर्चस्व गाजवण्यासाठी चीनने फिलीपाईन्स जवळील स्कारबोरोघ शोअल बेटावर हवाई आणि नौदलासाठी तळ उभारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सामरीकदृष्ट्या दक्षिण चीन समुद्राचे मोठे महत्त्व आहे. चीनने आणि शेजारील देशांमध्ये यावरून वाद सुरू आहेत. अमेरिकन वृत्तवाहिनी सीएनएनने न्या. (निवृत्त) अॅण्टोनियो कार्पियो यांच्या हवाल्याने सांगितले की, चीन लवकरच शोअल बेटावर हवाई आणि नौदलासाठी तळ उभारत आहे. चीनने एअर डिफेन्स डिटेक्शन झोन तयार करण्याबाबत संकेत दिले आहेत. त्याचा एकच अर्थ असून चीन लवकरच शोअल बेटावर आपला सैनिकी तळ उभारणार आहे, असे कार्पियो यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rajasthan Royals: IPL 2020: धोनीच्या चेन्नईची हाराकिरी, राजस्थानने साकारला मोठा विजय – ipl 2020: rajasthan royals beat chennai super kings by 7 wickets

अबुधाबी, IPL 2020 : चेन्नईच्या फलंदाजांना आजच्या सामन्यात सूर गवसला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सपुढे विजयासाठी १२६ धावांचे माफक...

Varun Gandhi: मदत मागणाऱ्यावर वरुण गांधी खवळले!; म्हणाले, ‘मी काय तुमचा नोकर नाही’ – bjp pilibhit mp varun gandhi viral audio illegal liquor case...

पिलीभीतः उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथील भाजप खासदार वरुण गांधी ( varun gandhi ) यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला आहे. या कथित व्हायरल...

Recent Comments