Home विदेश usa give fighter jets to india: USA India भारताला अद्यावत लढाऊ विमाने;...

usa give fighter jets to india: USA India भारताला अद्यावत लढाऊ विमाने; अमेरिका सिनेटमध्ये विधेयक सादर – two us senators introduce legislations to strengthen india us defence ties


वॉशिंग्टन: भारत आणि चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनविरोधात भारताला काही देशांनी मदत देऊ केली आहे. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकाही सक्रिय झाली आहे. आशिया खंडात अमेरिकेने आपले सैन्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर, दुसरीकडे भारताला अद्यावत लढाऊ विमाने देण्याबाबतचे विधेयक अमेरिकन सिनेटमध्ये सादर करण्यात आले आहे. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यास भारताला अमेरिकेकडून एफ-२२ आणि एफ-३५ सारखे अद्यावत लढाऊ विमान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

आतापर्यंत हे लढाऊ विमान इस्रायल, जपान आणि दक्षिण कोरिया आदी देशांकडेच आहेच. या देशांचा आणि अमेरिकाचा घनिष्ठ संबंध आहे. अमेरिकेत सत्तेवर असलेल्या रिपब्लिकन आणि विरोधी पक्षातील डेमोक्रेट पक्षाच्या दोन मोठ्या सिनेटरने भारतासोबत लष्करी संबंध आणखी घट्ट करण्यासाठी विधेयक आणले आहे. यामुळे पाचव्या पिढीतील लढाऊ विमान आणि लष्करी क्षेत्रात विकास, सहकार्य करण्यासाठीचा मार्ग मोकळा होणार आहे.

वाचा: शत्रूला धडकी भरवणार राफेल; भारतात ‘असा’ दाखल होणार!

इस्रायल-अमेरिका द्विपक्षीय तंत्रज्ञान संशोधन आणि विकास मॉडेलच्या धर्तीवर अमेरिका-भारतात खासगी क्षेत्रात सहकार्य निर्माण होऊ शकते का, अशी विचारणा सिनेटर मार्क वॉर्नर आणि सिनेटर जॉन कॉर्निन यांनी संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांना केली आहे. असे झाल्यास भारत-अमेरिकेतील खासगी क्षेत्रात संरक्षणाबाबत महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.

वाचा: चीनचा भारताला धोका; युरोपमधील अमेरिकेच्या फौजा आशियाकडे रवानाः पॉम्पिओ

वाचा: भारत, तैवाननंतर आता ‘या’ देशाच्या भूभागावर चीनचा दावा!

सिनेटर कॉर्निन यांनी हे विधेयक मंजूर झाल्यास १८० दिवसांमध्ये भारताला अमेरिकेच्या पाचव्या पिढीच्या फायटर जेट विमानाबाबतची माहिती देण्याबाबतची सूचना केली आहे. त्याशिवाय या विधेयकानुसार, पेंटागॉनमधून दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबत शिफारस आणि अन्य मुद्यांवर एक अहवाल मागितला आहे. जेणेकरून भारत स्वत: ही लढाऊ विमाने विकसित करू शकेल. त्याशिवाय, गोपनीय संरक्षण तंत्रज्ञान आणि उपकरण देण्यासाठी दोन्ही सिनेटरांनी आपल्या विधेयकात इस्रायल आणि न्यूझीलंड प्रमाणे ‘नाटो प्लस’ देशांच्या यादीत भारताचा समावेश करण्यासाठी एक संयुक्त विधेयकही सादर केले आहे.

वाचा: चीनला अद्दल घडवा! अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर

दरम्यान, इस्राएलकडून एक मोठे सुरक्षा कवच मिळणार आहे. इस्राएलकडून भारत तातडीने एअर डिफेन्स सिस्टिम खरेदी करण्याची शक्यता आहे. भारत इस्राएलकडून ‘बराक-८ एलआरएस’ खरेदी करणार असल्याची चर्चा आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव वाढल्यानंतर काही देशांनी भारताला शस्त्राचे पाठबळ पुरवण्याची तयारी सुरू केली आहे. राफेल विमानांचा पहिला ताफा भारतीय हवाई दलात पुढील महिन्यात दाखल होणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Cyber insurance: सायबर गुन्ह्यांचे शिकार झालात; काळजी करु नका, लवकरच त्यावर मिळणार भरपाई – irda bats for cyber insurance

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : वैयक्तिक तसेच व्यावसायिक स्तरावर वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांची गंभीर दखल अशा गुन्ह्यांपासून व्यक्ती आणि व्यवसाय यांना वाचवण्यासाठी तसेच यामुळे...

Ram Shinde slams Khadse: खडसेंना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही; माजी मंत्र्याची टीका – eknath khadse will repent for leaving bjp, says former minister ram...

अहमदनगर: 'भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिलाय. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे समजते. मात्र खडसे यांना ज्येष्ठ नेते म्हणून भाजपमध्येजी...

Raosaheb Danve: चोरून लग्न तुम्ही करता आणि बापाला संसार चालवायला सांगता?; दानवेंची फटकेबाजी – bjp leader raosaheb danve taunt cm uddhav thackeray over farmers...

सुरेश कुलकर्णी । जालना'तुम्ही चोरून लग्न लावलं अन् बापानं संसार चालवावा अशी कशी अपेक्षा करता?,' अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केंद्र...

Recent Comments