Home विदेश usa h1b visa: आधीच चीनसोबत तणाव; अमेरिका देणार भारताला झटका? - us...

usa h1b visa: आधीच चीनसोबत तणाव; अमेरिका देणार भारताला झटका? – us president donald trump will suspend h1b visas affect on indian youth


वॉशिंग्टन: चीनसोबत तणाव सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताला मोठा झटका देण्याच्या तयारीत आहेत. अमेरिकेच्या नॅशनल पब्लिक रेडियोनुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एच१बी, एल१ सह इतरबी व्हिसा निलंबित करणार असून त्याबाबत ऑक्टोबर महिन्यात अंतिम मंजुरी देण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत करोनाच्या संसर्गामुळे अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. त्याच्या परिणामी बेरोजगारीतही वाढ झाली आहे. लाखोंचा रोजगार गेल्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बेरोजगारी हा मुख्य मुद्दा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या तोंडावर ट्रम्प हे कोणतीही जोखीम पत्करण्यास तयार नाहीत. नोकरीबाबतच्या एच१बीसह अन्य व्हिसा निलंबित करण्याचे आदेश ट्रम्प देण्याची दाट शक्यता आहे.

वाचा: भारत-चीन तणाव: चर्चेच्या गप्पा करणाऱ्या चीनचा युद्धसराव!

‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, अमेरिकन सरकार आगामी आर्थिक वर्षात या प्रस्तावाला मान्यता देऊ शकते. अमेरिकेत आर्थिक वर्ष एक ऑक्टोबरपासून सुरू होते. त्याचवेळी नवीन व्हिसा जारी करण्यात येतात. या निर्णयामुळे कोणत्याही नवीन एच१ बी व्हिसाधारकाला अमेरिकेत नोकरी करण्यास मनाई असणार आहे. व्हिसा निलंबन करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतरच व्हिसाधारकांना नोकरी करता येणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. एच१बी व्हिसा हा अमेरिकेतील कंपन्यांना परदेशातील नागरिकांना नोकरी करण्यास मान्यता देतो. यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा मोठा वाटा आहे.

वाचा: चिनी मालावर बहिष्कार; चीनने आता भारताला दिले हे आव्हान

भारतावर परिणाम होणार

अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये भारत आणि चीनमधून हजारो कर्मचाऱ्यांना नोकरी मिळते. विशेषत: भारतीय कर्मचाऱ्यांना अधिक मागणी असते. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे भारतीयांना मोठा धक्का बसणार आहे. करोनाच्या संकटामुळे याआधीच एच१बी व्हिसाधारकांना नोकरी गमवावी लागली आहे. अनेक भारतीय अमेरिकेतून मायदेशी परतले आहेत. नवीन व्हिसा जारी न झाल्यामुळे हजारो भारतीय युवकांना रोजगार गमावण्याची वेळ येऊ शकते. भारतातही करोनाच्या संसर्गामुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. त्याचाही परिणाम रोजगारावर होत आहे.

वाचा: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फेसबुकचा दणका!
वाचा:
भारत व तैवानसोबत वाद; चीन ‘नाटो’च्या रडारवर!
अमेरिकात आणि चीनमध्येही वाद सुरू असून चीनमधील युवकांना अमेरिकेतील रोजगार गमवावा लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेने याआधीच चीनवर दबाव तंत्र सुरू केले आहे. व्यापारी कराराच्या मुद्यावरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू असतानाच करोना संसर्गाचीही त्यात भर पडली. त्यामुळे आता ट्रम्प यांनी व्हिसा निलंबित करण्याचा निर्णय घेतल्यास भारत आणि चीनमधील युवकांना याचा मोठा फटका बसणार आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

PM Modi: PM मोदींचा जागतिक पुरस्काराने सन्मान; म्हणाले, ‘भारतीय जनतेला…’ – pm modi conferred with the ‘global energy and environment leadership award’

नवी दिल्लीः ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचे अनेक आघाड्यांवरील अभियानन आणि जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पंतप्रधान मोदी यांना शुक्रवारी सेरावीक ग्लोबल एनर्जी...

Recent Comments