Home विदेश usa protest: USA वर्णद्वेषातून भारतीय रेस्टॉरंटची नासधूस; ट्रम्प यांच्या समर्थनाच्या घोषणा -...

usa protest: USA वर्णद्वेषातून भारतीय रेस्टॉरंटची नासधूस; ट्रम्प यांच्या समर्थनाच्या घोषणा – indian restaurant vandalised in us, racist graffiti written at site


वॉशिंग्टन: अमेरिकेत ‘न्यू मेक्सिको’मधील सांते फे सिटी येथील भारतीय रेस्टॉरंटची तोडफोड करण्यात आली. शीख समाजाच्या व्यक्तीचे हे रेस्टॉरंट फोडण्यात आले. या वेळी भितींवर द्वेषपूर्ण वक्तव्ये लिहिण्यात आली होती, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

‘इंडिया पॅलेस रेस्टॉरंट’चे या घटनेत एक लाख अमेरिकी डॉलरचे नुकसान झाले आहे. बलजितसिंग या रेस्टॉरंटचे मालक आहेत. रेस्टॉरंटच्या भिंतीवर ‘व्हाइट पॉवर’, ‘ट्रम्प २०२०’, ‘गो होम’ आणि इतर अपशब्द रेस्टॉरंटच्या भिंती, दरवाजे, काउंटर आदी ठिकाणी स्प्रे पेटने लिहिण्यात आले होते. काही वाक्ये वर्णद्वेषी, तसेच धमकी देणारी होती, असे ‘सांता फे रिपोर्टर’ या स्थानिक वृत्तपत्राने म्हटले आहे.

वाचा: भीती खरी ठरली! ट्रम्प यांनी दिला भारतीयांना झटका

या प्रकरणी स्थानिक पोलिस आणि एफबीआय तपास करत आहेत. ‘द शीख अमेरिकन लीगल डिफेन्स अँड एज्युकेशन फंड’ (एसएएलडीईएफ) या नागरी हक्क संघटनेने या घटनेचा निषेध केला आहे. सांते फे हे शांत शहर असून, शीख समाज येथे १९६०पासून एकात्मतेने राहत आहे, असे या संघटनेचे सदस्य सिमरनसिंग यांनी सांगितले. तोडफोड झालेल्या रेस्टॉरंटपासून ते मिनिटभराच्या अंतरावर राहायला आहेत. बलजितसिंग यांच्या कुटुंबीयांकडून परिसरातील बेघर आणि गरिबांना मोफत अन्न वाटप आणि सॅनिटरी उत्पादने देण्यात येत होते. हल्लेखोरांनी रेस्टोरंटवर हल्ला केल्यानंतर अन्न पाकिटे आणि वस्तू चोरल्या नेल्या आहेत. बलजित सिंग यांच्यासाठी काहीजणांनी निधी संकलनसाठी ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे.

वाचा: वर्णद्वेष विरोधी आंदोलन: ट्रम्प यांच्या प्रचार सभास्थळी राडा
राज्यपाल मिशेल लुजान ग्रीश्म यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. बलजित सिंग यांच्याशी आपला संपर्क झाला असून त्यांना मदत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर, महापौर अॅलन वेब्बर यांनीदेखील या तोडफोडीचा निषेध केला आहे. हल्लेखोरांचा त्वरीत शोध घेण्यात येणार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अमेरिकेत वर्णद्वेष विरोधी आंदोलन सुरू आहे. जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय तरुणांच्या मृत्यूनंतर अमेरिकेत वर्णद्वेष विरोधी आंदोलन तीव्र झाले होते. त्यातून काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागले. तर, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टुल्सा येथील निवडणूक प्रचार सभास्थळी आंदोलक आणि ट्रम्प समर्थकांमध्ये राडा झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर अमेरिकेतील वर्णद्वेष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Arnab Goswami: हक्कभंग समितीचे अर्णब गोस्वामींना समन्स; ‘हे’ आहे कारण – legislative assembly violation committee sommones to arnab goswami

टीआरपी घोटाळ्याच्या चौकशीत अडचणीत आलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना विधानसभेच्या हक्कभंग समितीने समन्स बजावले आहे.  Source link

Mumbai Coastal Road Project: ‘किनारी मार्ग’ वेगात – mumbai coastal road project :100 meters of underground tunnel dug in mumbai

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या किनारी मार्गाने नुकताच एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. 'मावळा' या टीबीएम मशिनने खणल्या...

Recent Comments