Home विदेश usa russia: पोलंडमध्ये अमेरिकन सैन्य तैनात होणार; रशियासोबत तणाव वाढणार! - usa...

usa russia: पोलंडमध्ये अमेरिकन सैन्य तैनात होणार; रशियासोबत तणाव वाढणार! – usa russia tension us will move some troops from germany to poland


वॉशिंग्टन: करोनाच्या मुद्यावर चीनविरोधात मोहीम सुरू करणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियालाही अंगावर घेण्याची तयारी केली असल्याची चर्चा आहे. आगामी काळात अमेरिका आपले सैन्य पोलंडमध्ये तैनात करणार आहेत. हे सैन्य बाल्टिक समुद्र क्षेत्रात असणार आहे. त्यामुळे रशिया आणि अमेरिकेत तणाव वाढणार असल्याची चर्चा झाली आहे. रशियाचा समुद्रमार्गे सर्वाधिक व्यापार हा सेंट पीटर्सबर्ग पोर्टपासून बाल्टिक समुद्र मार्गे होतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, सध्या जर्मनीत असलेल्या अमेरिकन सैनिकांपैकी काहीजणांना पोलंडमध्ये पाठवण्यात येणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात जर्मनीतील ५२ हजार सैनिकांची संख्या २५ हजार करणार असल्याचे सांगितले होते. अमेरिकेच्या दौऱ्यावर आलेले पोलंडचे राष्ट्रपती आंद्रेज डूडा यांच्यासोबत ट्रम्प यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी जर्मनीतील सैन्य पोलंडमध्ये पाठवणार असल्याचे म्हटले.

वाचा: लडाखमध्ये चीनकडून ‘अशी’ सुरू आहे दगाबाजी; सॅटेलाइट फोटोतून खुलासा

ट्रम्प यांनी सांगितले की, पोलंडच्या विनंतीवरून आम्ही अतिरिक्त सैन्य पाठवणार आहोत. त्यासाठी पोलंड आम्हाला रक्कमही देणार आहेत. जर्मनीतील आमचे सैन्य पोलंडला वळवणार असल्याचे त्यांनी सांगतिले. जर्मनीत आता अमेरिकेचे २५ हजार सैन्यच असणार आहे. सध्या तेथे ५२ हजार सैन्य आहे.

पाहा: मॉस्कोत व्हिक्ट्री डे परेड; भारतीय सैन्य दलाचे शानदार संचलन

ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, जर्मनीतून कमी करण्यात आलेले काही सैन्य स्वगृही परततील. तर, काहीजणांना अन्य देशांमधील लष्करी तळावर पाठवण्यात येणार आहे. त्यात पोलंडचाही समावेश आहे. या निर्णयामुळे रशियाला योग्य तो संदेश जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचा: अमेरिकेच्या लढाऊ विमानांना रशियन हवाई दलाने पिटाळले

ट्रम्प यांनी जर्मनीवरही निशाणा साधला. जर्मनी पाइपलाइनच्या माध्यमातून रशियाकडून पेट्रोल आणि गॅस खरेदी करते. त्यासाठी अब्जावधी डॉलर खर्च होता. रशियाला जर्मनी अब्जावधी डॉलर देत असताना आम्ही रशियापासून त्यांचे संरक्षण करावे अशी अपेक्षाही करत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

दरम्यान, मागील महिन्यात रशियाच्या हद्दीत अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी घुसखोरी केली असल्याचा आरोप रशियाने केला होता. बाल्टिक आणि काळा समुद्रातील रशियाच्या हद्दीत अमेरिकन हवाई दलाचे बी-१ बी लाँग रेंज स्ट्रेटॅजिक बॉम्बरला रुसी हवाई दलाने पिटाळून लावले. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या घटनेचा व्हिडिओ जाहीर केला आहे. अमेरिकेचे हे घातक विमान रशियाच्या हद्दीत शिरले होते. त्यानंतर रशियन हवाई दलाने सुखोई एसयू-२७पी आणि एसयू-३० एम विमानांना पाठवले. दोन्ही विमानांनी अमेरिकन बॉम्बरचा पाठलाग करत रशियन हद्दीतून पिटाळून लावले असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, त्यावर अमेरिकेने काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

mumbai maximum temperature: मुंबईच्या तापमानात वाढ – mumbai weather : mumbai maximum temperature increases

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईसह राज्याच्या काही शहरांत पहाटे अजूनही किंचितसा गारवा जाणवत असला तरी हळुहळू तापमान वाढत आहे. किमान आणि कमाल तापमान...

MNS-BJP alliance: Nashik: मनसेच्या ‘या’ दोन निर्णयांमुळं नव्या राजकीय समीकरणांची चर्चा – bjp mns may form alliance to fight nashik municipal election

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकमहापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती निवडणुकीतही मनसेने भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्याने आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसे एकत्र...

Recent Comments