Home शहरं पुणे uttam bandu tupe death : 'झुलवा'कार उत्तम बंडू तुपे यांचं निधन -...

uttam bandu tupe death : ‘झुलवा’कार उत्तम बंडू तुपे यांचं निधन – pune: veteran marathi author uttam bandu tupe passes away at 78


पुणे: आपल्या साहित्यातून उपेक्षित आणि ग्रामीण जीवनाचे चित्र करणारे ज्येष्ठ साहित्यिक व ‘झुलवा’कार उत्तम बंडू तुपे यांचं आज पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. आज दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

तुपे हे गेल्या अनेक महिन्यापासून आजारी होते. त्यांची पत्नी जिजा यांचं काही महिन्यापूर्वीच पक्षाघातामुळं निधन झालं होतं. उत्तम तुपे यांना दोन दिवसांपूर्वी जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुलं असा परिवार आहे.

तब्बल १६ कादंबऱ्यांसह अनेक लघुकथांना शब्दरूप देणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांची ‘झुलवा’ ही कादंबरी प्रचंड गाजली. तेव्हापासून ते ‘झुलवा’कार म्हणूनच ओळखले जाऊ लागले. खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी, भस्म, चिपाड, इंजाळ, झावळ या त्यांच्या कादंबऱ्याही गाजल्या. अनेक कादंबऱ्यांना पुरस्कार मिळाले. ‘आंदण’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला. ‘काट्यावरची पोटं’ या आत्मकथेला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळाला. ‘झुलवा’ कादंबरीला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला.

उत्तम बंडू तुपे आयुष्याच्या उत्तरार्धात हलाखीचे जीवन जगत होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’नं
(शब्दश्रीमंत लेखकाचे ‘काट्यावर पोट’) प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर त्यांना हक्काचे निवासस्थान मिळाले होते. विविध नेते, विविध पक्ष व संघटना आणि समाजातील व्यक्तींनी दातृत्व दाखवून


त्यांना लाखो रुपयांची मदत केली होती. यामुळे तुपे यांची जगण्याची लढाई काहीशी सोपी झाली होती.

ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी तुपे यांच्या ‘झुलवा’ कादंबरीवर आधारित नाटक रंगभूमीवर आणले होते. त्यात अभिनेते सयाजी शिंदे आणि सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी भूमिका केल्या होत्या.

उत्तम बंडू तुपे यांची शब्दश्रीमंती

इजाळ (कादंबरी)

खाई (कादंबरी)

खुळी (कादंबरी)

चिपाड (कादंबरी)

झावळ (कादंबरी)

झुलवा (कादंबरी)

भस्म (कादंबरी)

लांबलेल्या सावल्या (कादंबरी)

शेवंती (कादंबरी)

संतू (कादंबरी)

आंदण (लघुकथा संग्रह)

पिंड (लघुकथा संग्रह)

माती आणि माणसं (लघुकथा संग्रह)

कोबारा (लघुकथा संग्रह)

काट्यावरची पोटं (आत्मचरित्र)

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

mumbai news News : NCP: राष्ट्रवादीने आघाडीधर्म पाळला; शिवसेनेच्या विरोधातील ‘त्या’ बंडखोराची हकालपट्टी – candidate who rebelled against shiv sena expelled from ncp

मुंबई: अमरावती शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचा उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे. या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरणाऱ्या चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर...

‘डेथ ऑडिट’कडे महापालिकेचे दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, करोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण औरंगाबाद शहरात कमी होताना दिसत नाही. तीन ते साडेतीन टक्क्यांवर कायमच आहे. त्यामुळे...

Recent Comments