Home देश Uttar Pradesh: कॉलेजमधून बेपत्ता झाली होती विद्यार्थिनी; हायवेलगत शेतात निर्वस्त्र, जखमी अवस्थेत...

Uttar Pradesh: कॉलेजमधून बेपत्ता झाली होती विद्यार्थिनी; हायवेलगत शेतात निर्वस्त्र, जखमी अवस्थेत सापडली – uttar pradesh shahjahanpur missing college girl student found at field near highway


हायलाइट्स:

  • कॉलेजमधून बेपत्ता झाली होती विद्यार्थिनी
  • दहा किलोमीटरवर शेतात निर्वस्त्र, गंभीर जखमी अवस्थेत सापडली
  • उत्तर प्रदेशातील शहाजहांपूरमध्ये घडली घटना
  • पोलीस तपास सुरू, काय घडलं होतं नेमकं?

शाहजहांपूर: उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये कॉलेजमधून बेपत्ता झालेली बीएची विद्यार्थिनी महामार्गालगतच्या शेतात गंभीर जखमी आणि निर्वस्त्र अवस्थेत सापडली. तिला लखनऊ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थिनीसोबत नेमके काय घडले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

तिलहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्ग क्रमांक २४ वरील नगरिया येथे घडली. महामार्गालगतच्या शेतात मुलगी निर्वस्त्र आणि गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे तेथील ग्रामस्थांना दिसले. ग्रामस्थांनी तातडीने याबाबत पोलिसांना कळवले. त्यानंतर तात्काळ तरुणीला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले.

भयंकर! केक डीलिव्हरी बॉयने ६६ महिलांवर केला बलात्कार

जखमी झालेल्या तरुणीने आपल्या वडिलांचा मोबाइल क्रमांक पोलिसांना सांगितला. त्यानंतर तिचे कुटुंबीय मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले. तरुणी जलालाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. ती शहरातील एका कॉलेजात शिक्षण घेत आहे. सकाळी तिचे वडील तिला कॉलेजात सोडून गेले होते. त्यानंतर ती अचानक कॉलेजमधून बेपत्ता झाली. वडिलांनी तिचा सगळीकडे शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. संध्याकाळी कॉलेजपासून १० किलोमीटर अंतरावरील एका शेतात ती निर्वस्त्र अवस्थेत सापडली. ती गंभीर जखमी झाली होती. तिच्यासोबत काय घडले? हे अद्याप कळू शकले नाही.

थरार! अख्खं कुटुंब गाढ झोपेत होतं; मध्यरात्री ४ जण घरात घुसले अन्…

पीडितेचे कुटुंबीयही काही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांना या घटनेनंतर प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मुलीच्या जबाबानंतरच तिच्यासोबत नेमके काय घडले हे सांगता येईल. सध्या तिला लखनऊतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nanded govt officers horse latest news: ‘या’ अधिकाऱ्याला घोड्यावरून ऑफिसला यायचंय!; विनंती पत्र झालं व्हायरल – official seeks nod to tie horse on campus...

हायलाइट्स:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याचं पत्र चर्चेत.कार्यालयाच्या आवारात घोडा बांधण्यासाठी मागितली परवानगी.अजब पत्राने जिल्हाधिकारी विपिन इटनकर पडले बुचकळ्यातनांदेड:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागात...

Recent Comments