Home देश Uttar Pradesh: फिंगरप्रिंट क्लोनिंग ऑनलाइन शिकला; ५०० बँक खाती केली हॅक, पोलीसही...

Uttar Pradesh: फिंगरप्रिंट क्लोनिंग ऑनलाइन शिकला; ५०० बँक खाती केली हॅक, पोलीसही चक्रावले – uttar pradesh sahjahanpur man hacks more than 500 accounts after cloning fingerprints


बरेली: उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथे पोलिसांनी २६ वर्षीय गौरव या तरुणासह सहा जणांना अटक केली आहे. गौरवने ५०० बँक खाती हॅक करून त्यांच्या खात्यातून पैसे काढल्याचा आरोप त्याच्यावर आहे. शेतकरी सन्मान योजना, पेन्शन आणि अन्य सरकारी योजनांच्या लाभार्थींच्या खात्यातून पैसे काढले. फिंगरप्रिंट क्लोनिंगचे धडे त्याने ऑनलाइन घेतले. एका फिंगरप्रिंट क्लोनिंगसाठी फक्त पाच रुपये खर्च येत असल्याचे गौरवने पोलिसांना सांगितले. गौरवचे ‘कारनामे’ ऐकून पोलीसही चक्रावून गेले.

गौरवने पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. कँट परिसरात तो फोटोचे दुकान चालवतो. हे रॅकेट जलालाबाद परिसरातून काम करत होते. पोलिसांना या टोळीकडे अनेक आधार कार्ड, बँक पासबुक आणि ५०० क्लोन केलेले बोटांचे ठसे सापडले.

‘त्या’ ज्वेलर्सच्या घरात घडलं होतं भयानक; एकही पुरवा मागे सोडला नव्हता, पण…

‘असा’ केला पर्दाफाश

पोलिसांच्या माहितीनुसार, याबाबत अनेक लोकांच्या तक्रारी आल्या होत्या. सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे सांगण्यात आले. पण त्यांच्या खात्यातून पैसे ‘गायब’ झाले. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणांचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला. तपासात शिवराम, सुनील त्रिपाठी, देव व्रत, संदीप सिंह, शेहरून, राजवीर आणि हुकूम सिंह यांची नावे समोर आली. पोलिसांनी शिवराम, सुनील, देव आणि संदी यांना अटक केली. त्यांच्याकडे क्लोनिंग केलेले बोटांचे ठसे आणि बनावट तिकीट सापडले. गौरवला त्यानंतर अटक करण्यात आली. आरोपी हे अशिक्षित खातेदारांना लक्ष्य करत होते. आरोपींनी क्लोनिंग आणि खात्यातून पैसे काढण्याच्या प्रक्रियेचे ऑनलाइन धडे घेतले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कॉलेजमधून बेपत्ता झाली होती विद्यार्थिनी; हायवेलगत शेतात निर्वस्त्र, जखमी अवस्थेत सापडलीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

raj thackeray: तर माझा पक्ष संपूर्ण सहकार्य करायला तयार; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र – raj thackeray open letter to cm uddhav thackeray over nanar...

हायलाइट्स:राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना पत्रनाणार रिफायनरी प्रकल्पावरुन राज ठाकरेंनी लिहलं पत्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली मागणीमुंबईः रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात नाणार येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी...

nashik sahitya sammelan postponed: nashik sahitya sammelan : नाशिकच्या साहित्य संमेलनाला स्थगिती, मे अखेर होणार संमेलन – nashik akhil bhartiya sahitya sammelan postponed

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकः नाशिकमध्ये २६ ते २८ मार्च दरम्यान होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोविडच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय अखिल...

'करोनाची स्थिती नियंत्रणाबाहेर'

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद शहरात संसर्गाची स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, अशी कबुली महापालिकेचे प्रशासक यांनी दिली आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे लॉकडाउनशिवाय...

Recent Comments