Home देश Uttar Pradesh crime: महिलेसमोर अश्लील चाळे करणारा इन्स्पेक्टर फरार, २५ हजार 'इनाम'...

Uttar Pradesh crime: महिलेसमोर अश्लील चाळे करणारा इन्स्पेक्टर फरार, २५ हजार ‘इनाम’ – uttar pradesh crime masturbation in front of women accused inspector absconding


देवरिया: उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील भटनी पोलीस ठाण्यात तक्रारदार महिलेसमोर अश्लील चाळे करणारा आरोपी पोलीस निरीक्षक फरार झाला आहे. पीडित महिला संपत्तीवरून सुरू असलेल्या वादासंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्याने तिच्यासमोरच अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी तिने तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी अधिकारी फरार झाला आहे. देवरिया पोलीस अधीक्षकांनी त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला २५ हजार रुपये बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले आहे. पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहेत.

देवरियातील भटनी पोलीस ठाण्याचे अधिकारी भीष्मपाल सिंह यादव याने तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या महिलेसमोरच हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली होती. या घटनेवरून संताप व्यक्त करण्यात येत होता. आरोपी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी होत होती. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून आरोपी पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बहिणीवरील बलात्काराचा त्याने ६ वर्षांनंतर ‘असा’ घेतला बदला

पोलीस अधिकाऱ्यानं महिलेसमोरच केलं हस्तमैथुन; व्हिडिओ व्हायरल

भटनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमवा तिवारी गावातील एक तरुणी आपल्या आईसोबत जमिनीच्या वादासंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती. पीडितेच्या तक्रारीनुसार, तेथील पोलीस अधिकारी भीष्मपाल सिंह यादव याच्या केबिनमध्ये गेल्यानंतर त्यांनी परवानगी दिल्यानंतर समोरच्या खुर्चीवर बसली. जमिनीच्या वादासंबंधी माहिती देत असताना, यादव अश्लील चाळे करू लागला. याचा व्हिडिओ काढला. घरी गेल्यानंतर तो कुटुंबीयांना दाखवला. त्यानंतर शेजारच्या व्यक्तीने सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला.

पूर्वाश्रमीच्या प्रियकराने महिलेला भरबाजारात भोसकले, पोलीस येईपर्यंत तो…

पुणे हादरले; भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करून रिक्षाचालकाची हत्या

पोलीस अधीक्षकांनी घेतली गंभीर दखल

पोलीस अधिकाऱ्याने अश्लील चाळे केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागात खळबळ माजली. पोलिसांविरोधात संताप व्यक्त होत असताना, पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपी यादव याच्याविरोधात भटनी पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला आहे. यादवबद्दल माहिती दिल्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे पोलीस अधीक्षकांनी जाहीर केले. आरोपी यादव याला चार दिवसांपूर्वीच निलंबित करण्यात आले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

rain in Nashik: ऑक्टोबर महिना ठरतोय दमदार – nashik also received heavy rains in october month

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकजिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यातही परतीच्या पावसाचा जोर कायम असून, आतापर्यंत १४५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. बागलाण तालुक्यात २८१ तर...

gold rate today: सोने-चांदी तेजीत; जाणून घ्या आजचा भाव – Gold Silver Price Today

मुंबई : कमॉडिटी बाजारात ५०८८८ रुपये आहे. चांदीच्या दरात मात्र ४७५ रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीचा भाव ६२३८१ रुपये झाला आहे....

Recent Comments