Home देश uttar pradesh murder: आधी फेसबुक लाइव्ह केला; पत्नीला गोळ्या घातल्यानंतर स्वतःही केली...

uttar pradesh murder: आधी फेसबुक लाइव्ह केला; पत्नीला गोळ्या घातल्यानंतर स्वतःही केली आत्महत्या – uttar pradesh murder husband kills wife commits suicide after live video in aligarh


अलीगढ: उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचाही मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. फेसबुक लाइव्ह केल्यानंतर तरुणानं पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. या दोघांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर दुःखी झालेल्या त्याच्या भावानंही स्वतःवर गोळ्या झाडून मृत्यूला कवटाळलं.

पोलिसांच्या माहितीनुसार, बरौला येथील बाबूलाल वर्मा याची तीन मुले होती. त्याच्या थोरल्या मुलाचं लग्न झालं. त्यानंतर तो पत्नीला घेऊन वेगळा राहू लागला. तर शैलेंद्र आणि विशाल ही दोन मुले त्यांच्यासोबत राहत होते.

दीड वर्षापूर्वीच केलं होतं कोर्टात लग्न

शैलेंद्र याने बी. फार्मपर्यंत शिक्षण घेतलं होतं आणि त्याने स्वतःचे मेडिकल स्टोअर सुरू केले होते. त्याचे उत्पन्न चांगले होते. शैलेंद्र याने दीड वर्षापूर्वी शेजारची मुलगी पिंकी वर्मा हिच्याशी लग्न केले होते. पिंकीसोबत त्याने कोर्टात लग्न केले होते. मात्र, त्यांच्या लग्नामुळे शैलेंद्रचे आईवडील खूश नव्हते.

बेरोजगार पतीसोबत कडाक्याचं भांडण; महिलेनं वाहत्या नदीत मारली उडी

वर्धा हादरले! १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

पिंकीवरून आईसोबत भांडण

शैलेंद्र कुटुंबापासून वेगळा झाला होता. तो पिंकीसोबत राहायचा. पिंकीसोबत लग्न झाल्यानंतर शैलेंद्रचे आईसोबत भांडण व्हायचे. तिला पिंकी पसंत नव्हती. शैलेंद्र याच कारणामुळे कायम तणावात असे, अशी माहिती शेजारील काही व्यक्तींनी दिली.

फेसबुक लाइव्ह केल्यानंतर…

घटनेच्या काही वेळ आधीच शैलेंद्रने फेसबुकवर लाइव्ह व्हिडिओ केला होता. मी खूप त्रासलो असून, आत्महत्या करत आहे. घरातील लोकांमुळे मी त्रस्त झालो आहे. त्यामुळे मला आता जगायचे नाही, असे तो लाइव्ह व्हिडिओत सांगत होता. फेसबुक लाइव्ह केल्यानंतर त्याने पिंकीला गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ‘तो’ रात्रीच्या अंधारात मंदिरांमध्ये जायचा…

‘तो’ नराधम धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर करायचा अत्याचार

भावाच्या मृत्यूचे दुःख, भावानेही केली आत्महत्या

गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर विशाल त्याठिकाणी धावत आला. भाऊ शैलेंद्र आणि पिंकी हे दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या मृत्यूचे दुःख अनावर झालेल्या विशालनेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. विशाल आणि शैलेंद्र यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पिंकीला रुग्णालयात घेऊन जात असताना, वाटेतच मृत्यू झाला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ind vs aus first ODI: टीम इंडियासाठी अलर्ट; पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचे पारडे जड, जाणून घ्या कारण – ind vs aus first odi australia can...

नवी दिल्ली: भारतीय संघ आठ महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. उद्यापासून म्हणजेच २७ नोव्हेंबरपासून भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू आहे. भारताच्या दौऱ्याची...

Recent Comments