Home देश uttar pradesh murder: लग्नाला नकार; तरुणीची भरबाजारात चाकू भोसकून हत्या - uttar...

uttar pradesh murder: लग्नाला नकार; तरुणीची भरबाजारात चाकू भोसकून हत्या – uttar pradesh murder girl stabbed to death in market ghaziabad


गाझियाबाद: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील तुलसी निकेतनमध्ये राहणाऱ्या तरुणीची बुधवारी रात्री एका तरुणाने भरबाजारात चाकू भोसकून निर्घृण हत्या केली. मारेकरी तरुण शेरखान घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. हे दोघांचाही या हत्येत सहभाग होता.

आरोपी शेरखान नैना नावाच्या या तरुणीच्या कुटुंबांना बऱ्याच दिवसांपासून धमकावत होता. फरार झालेल्या शेरखानबद्दल माहिती अथवा त्याला पकडून देणाऱ्या व्यक्तीला २० हजार रुपयांचे बक्षिस दिले जाईल, असं पोलिसांनी जाहीर केलं आहे. आरोपी शेरखान (वय २२) हा दिल्लीच्या सुंदरनगरीमध्ये राहतो.

पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणीचे वडील तुलसी निकेतनमधील बलदेव सिंह विवेक विहारमध्ये एका कारखान्यात नोकरी करतात. १९ वर्षीय नैना दिल्लीत नर्सिंगचा कोर्स करत होती. बुधवारी रात्री ती आपल्या आईवडिलांसोबत एका मोबाइल दुकानात गेली होती. त्याचवेळी एका चेहरा झाकलेल्या तरुणाने नैनाला धक्का मारला आणि तिला खाली पाडले. त्यानंतर तिच्यावर चाकूने सपासप वार केले, अशी माहिती तिचा मामेभाऊ राज याने दिली.

आरोपी नैनावर चाकूने वार करत असताना पाहून तिच्या आईवडिलांनी मारेकऱ्याला जोरदार प्रतिकार केला. मारेकऱ्याने नैनाच्या आईवरही वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, न घाबरता तिच्या आईने त्याला विरोध केला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. घटनास्थळावर बघ्यांची गर्दी जमली होती. मात्र, कुणीही त्यांच्या मदतीसाठी पुढे आले नाही.

आरोपी आणि त्याचे दोन साथीदार काही दिवसांपूर्वी तिच्या घरी गेले होते. आरोपीचा कपड्यांचा व्यवसाय आहे. आठवडाभरापूर्वीच त्याने घरी येऊन लग्नासाठी विचारणा केली होती. मात्र, नकार दिल्याने त्याने धमकावले होते, अशी माहिती नैनाच्या आईने दिली.

विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

नगरमध्ये खळबळ; बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jalgaon news News : Raksha Khadse: सासरे राष्ट्रवादीत, सूनबाई भाजपात!; खासदार रक्षा खडसेंचं मोठं विधान – we are saddened by the decision of eknath...

जळगाव: 'नाथाभाऊंच्या निर्णयाचे आम्हाला दुःख आहे. आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक आहे. पण, मी भाजपकडून निवडून आले आहे आणि यापुढेही भाजपतच काम करत...

deepak maratkar murder: Pune: युवा सेना नेते दीपक मारटकर हत्या प्रकरणी सर्व आरोपींवर मोक्का – pune shiv sena youth wing leader deepak maratkar murder...

म. टा. प्रतिनिधी, पुणे: युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर हत्या प्रकरणातील (Deepak Maratkar murder case) सर्व आरोपींवर 'मोक्का' (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली...

Election Commission: ‘निवडणूक प्रचार सभेत मास्क घाला, शारीरिक अंतर पाळा’; निवडणूक आयोगाने खडसावले – bihar assembly election 2020 election commission writes letter to all...

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Assembly Elections) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांच्या अध्यक्षांना आणि सरचिटणीसांना पत्र लिहिले आहे. देशात सुरू असलेला...

Recent Comments