Home महाराष्ट्र Vaibhav Pichad praises Sharad Pawar: पिचड पिता-पुत्रांच्या मनात काय?; वडिलांनंतर मुलानंही केलं...

Vaibhav Pichad praises Sharad Pawar: पिचड पिता-पुत्रांच्या मनात काय?; वडिलांनंतर मुलानंही केलं शरद पवारांचं कौतुक – bjp leader vaibhav pichad praises ncp chief sharad pawar


अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ नेते व सध्या भाजपमध्ये असलेले मधुकर पिचड यांच्यानंतर आता त्यांचे पुत्र माजी आमदार वैभव पिचड यांनीही शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. ‘शरद पवारांचं नेतृत्व मोठं आहे. ते कुणीही अमान्य करू शकत नाही,’ असं वैभव पिचड यांनी म्हटलं आहे. वडिलांनंतर मुलानंही केलेल्या या कौतुकामुळं नगरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

वाचा: ‘बरे झाले शरद पवारांनी शिवसेनेबरोबर सरकार घडवून आणले’

वैभव पिचड हे आज जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली. भेटी दरम्यान त्यांनी गाव पातळीवर सरपंचांना करोना संबंधी काम करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी गोपीचंद पडळकर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. पडळकर यांनी पंढरपूरमधील एका पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यावर पातळी सोडून टीका केली होती. ‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले करोना आहेत,’ असं पडळकर म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ते पडळकरांचे वैयक्तिक मत असल्याचं सांगून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पवारांचे जुने अनुयायी असलेले मधुकर पिचड यांना ही टीका सहन झाली नाही. त्यांनी स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज त्यांचे पुत्र वैभव यांनीही आपलं मत मांडलं.

maharashtra times

वाचा: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कामकाजात मराठीच हवी अन्यथा…

‘पवारांचं नेतृत्व राज्यव्यापी आणि देशव्यापी आहे. गेली ५० वर्ष ते अविरतपणे जनतेची कामे करत आहेत. ते ज्येष्ठ नेते आहेत. ज्येष्ठ माणसाचा आपल्याकडं अनादर केला जात नाही. त्यामुळं त्यांच्याबद्दल कोणी चुकीचा शब्द वापरला असेल तर त्या व्यक्तीला देखील समजून सांगण्याची गरज आहे. चुकीला चूक म्हणणे हे संस्कार आपल्याला वडिलधाऱ्या मंडळींकडून मिळाले आहेत. पडळकरांचं वक्तव्य चुकीचंच आहे,’ असं वैभव पिचड यांनी ठामपणे सांगितलं.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते शरद पवारांना सोडून गेले होते. विजयसिंह मोहिते-पाटील, पद्मसिंह पाटील, गणेश नाईक यांच्याबरोबरच पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे पिचड यांचाही त्यात समावेश होता. पुन्हा भाजपची सत्ता येणार या विश्वासानं ही पक्षांतरं झाली होती. मात्र, शरद पवारांनी सर्वांना धोबीपछाड देऊन राज्यात महाविकास आघाडीचा नवा प्रयोग केला. त्यामुळं भाजपबरोबरच पवारांना सोडून गेलेल्यांनाही सत्तेपासून दूर राहावं लागलं आहे. यातील अनेक जण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

‘लोकहितवादी’चा सन्मान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लोकहितवादी मंडळास मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीबद्दलचा...

Bihar election: संयमाची लस टोचा – editorial on bihar election 2020 and bjp promises free covid vaccine to people

विधानसभेच्या निवडणुका होत असलेल्या बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात सर्वांना करोनाची मोफत लस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन, सगळी नैतिकता खुंटीला...

Recent Comments